मोदींना १३५ लोकांच्या मृत्यूचं दु:ख नाही, पण ट्विटचा त्रास; मोरबी दुर्घटनेवरून TMCची टीका

 दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील कथित 'फेक ट्विट'मुळे सध्या तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले चांगलेच चर्चेत आले आहेत. गेल्या तीन दिवसांत त्यांना दोन वेळा अटक करण्यात आली आहे.साकेत गोखले यांनी भाजपच्या आदेशावरून त्यांना अटक करण्यात आल्याचा दावा केला आहे. तसेच मोदी एका ट्विटमुळे दुखावले गेले मात्र, त्यांना १३५ निरपराधांच्या मृत्यूचं काहीही नाही,' असं त्यांनी आज केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे."भाजपच्या आदेशानुसार मला अटक करण्यात आली, मला जामीन मिळाला, पुन्हा अटक करण्यात आली आणि मला पुन्हा जामीन मिळाला - 4 दिवसांच्या कालावधीत. माझे स्वातंत्र्य अबाधित ठेवल्याबद्दल मी सन्माननीय न्यायपालिकेचा आभारी आहे,'पहिल्या प्रकरणात जामीन मंजूर झाल्यानंतर पुन्हा एकदा अटक केल्यानंतर गोखले यांना जामीन मिळवण्यात यश आले. निवडणूक आयोगाला 'भाजपचा मित्रपक्ष' असे संबोधून ते म्हणाले की, आपल्याविरोधात दुसरी तक्रार निवडणूक आयोगाने दाखल केली होती.मेट्रोपॉलिटन कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर काही तासांतच, गुजरात पोलिसांनी गुरुवारी गोखले यांना राज्यातील मोरबी शहरातील पूल कोसळल्याच्या ट्विटशी संबंधित प्रकरणात पुन्हा अटक केली. सत्ताधारी पक्षावर निशाणा साधत ते म्हणाले, 'भाजपला वाटत असेल की, मी यामुळे शांत होईल, तर ती त्यांची मोठी चूक ठरले. मी आता आणखी ताकदीने हल्ला करेल, असंही ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने