संगीता बिजलानीसाठी बॉडीगार्ड शेराला टोकलं..बर्थ डे पार्टीतील व्हिडीओ पाहून जो-तो हैराण

मुंबई: सलमान खान आजही आपली एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीवर जीव ओवाळून टाकतो हे अनेकदा दिसून आलं आहे. संगीता बिजलानी सलमानच्या ५७ व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला खास उपस्थित राहिली होती.सलमाननं संगीताला अलिंगन दिल्याचे आणि किस केल्याचे फोटो तर जोरदार व्हायरल झाले आहेत. सलमाननं स्वतः संगीताला तिच्या गाडीपर्यंत सोडलं,गाडीचा दरवाजा स्वतः उघडला आणि संगीताला सी ऑफ केलं. पण यात एक ट्वीस्ट आहे..तो पुढे सांगतोच.सध्या सलमानचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

सलमान खान आज ५७ वर्षांचा झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही सलमाननं आपलं कुटुंब आणि बॉलीवूडमधील काही खास सेलिबसाठी बर्थ डे पार्टीचं आयोजन केलं होतं. सलमानच्या या बर्थ डे पार्टीत बडे सितारे नजरेस पडले. पण पार्टीत सगळ्यांचे लक्ष खास वेधून घेतले ते सलमानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीनं.सगळ्यांचा नजरा पार्टीत सलमान आणि संगितामध्ये दिसून येणाऱ्या केमिस्ट्रीवरच खिळल्या होत्या. सलामननं संगीताला पाहिल्या पाहिल्या तिला घट्ट आलिंगन दिलं. आणि जेव्हा पार्टी संपली तेव्हा सलमान स्वतः संगीताला सोडायला गाडीपर्यंत गेला अन् गाडीचा दरवाजा त्यानं स्वतः खोलला.

सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हिडीओत आपण पाहू शकतो की सलमान खान संगीता बिजलानी सोबत तिच्या गाडीची वाट पाहत आहे. तिची गाडी आल्यावर पहिलं तर सलमाननं तिला एक घट्ट मिठी मारली,नंतर तिच्या माथ्यावर किस केलं,तेवढ्यात सलमानचा बॉडीगार्ड संगीता बिजलानीच्या गाडीचा दरवाजा खोलण्यासाठी पुढे धावत जाताना दिसतो,पण सलमान शेराचा हात पकडून त्याला तिथेच थांबवतो आणि स्वतः संगीताच्या गाडीचा दरवाजा खोलतो. संगीता बिजलानीसाठी सलमानच्या मनात आजही कुठेतरी काहीतरी भावना आहेत हे यावरनं नक्कीच दिसून आले.सलमान आणि संगीताच्या या लेटेस्ट फोटोंना पाहून प्रश्न पडत आहे की दोघं पुन्हा तर एकमेकांच्या प्रेमात पडले नाहीत ना? दोघांच्या या बर्थ डे पार्टीतील व्हायरल झालेल्या फोटोंनी आणि व्हिडीओनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अर्थात सलमानच्या घरी अनेकदा संगीता बिजलानीला स्पॉट केलं जातं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने