रितेश-जेनेलियाचा प्रेमात पाडणारा 'वेड'! अभिनय, गाणी सगळंच 'लई भारी'

मुंबई:  मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची अभिनेत्री पत्नी जेनेलिया हे दोघेही सोशल मीडियावर चर्चेत असणारे सेलिब्रेटी. आपल्या चित्रपटाचे प्रमोशन कसे करावे याचे तंत्र त्या दोघांकडून शिकण्यासारखे आहे. यापूर्वी रितेशनं त्याच्या चित्रपटांचे दणक्यात प्रमोशन करुन प्रेक्षकांना आपली कलाकृती पाहण्यास भाग पाडले होते.काही दिवसांपूर्वी रितेशच्या वेड चित्रपटावरुन वाद सुरु झाला होता. त्याला कारण म्हणजे त्याच्या बाऊन्सरनं पत्रकारांशी वाद घातला होता. बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख आणि नाव असणाऱ्या रितेशनं असं वागणं हे अनेकांना खटकलं होतं. जेनेलियाही सोशल मीडियावरुन ट्रोल करण्यात आले होते. यासगळ्यात रितेशनं माफी मागून त्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.सध्या रितेशच्या वेडची चर्चा आहे. बऱ्याच वर्षांनी तो त्याच्या वेड नावाच्या कलाकृतीच्या माध्यमातून समोर आला आहे. पडद्यावरील त्याचा आणि जेनेलियाचा लूक भारावून टाकणारा आहे. यापूर्वी देखील त्या दोघांच्या चित्रपटातील केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी पसंत केले होते. आता ते पुन्हा वेड मधून लाईमलाईटमध्ये आली आहे. चाहत्यांचा वेडला जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.अजय - अतुलच्या संगीताचा काळजाला भिडणारा स्वरसाज, बॉलीवूडच्या भाईजान सलमानचा कॅमिओ आणि यासाऱ्यात रितेश जेनेलियाचा पावरफुल अभिनय यामुळे वेड तुम्हाला वेडं करुन जातो हे नक्की. गाणी सुश्राव्य आहेत. संवाद फारसे लक्षात राहणारे नसले तरी कथेला पुढे घेऊन जाण्यात महत्वाची भूमिका बजावताना दिसतात. केवळ रितेशच नाही तर प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांनी देखील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

रितेशनं वेडचे ज्याप्रकारे प्रमोशन केले त्यामुळे तो मोठ्या प्रमाणात त्याचा चित्रपट पोहचविण्यात यशस्वी झाला आहे. त्यानं प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी प्रवृत्त केले आहे. यापूर्वी रितेशच्या लई भारीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या ही चित्रपटात त्यानं दिग्दर्शक म्हणून केलेली कामगिरी प्रभावी आहे. दिग्दर्शक, निर्माता, भूमिका म्हणून त्यानं पेलेलं शिवधनुष्य हे त्यानं यशस्वीरित्या पेललं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने