Gram Panchayat Election : सरपंचपदासाठी २६७७, सदस्यांसाठी १६५२० अर्ज

 कोल्हापूर : जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. ऑनलाईन अर्ज भरण्यास अडचणी येत असल्याने ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची मुभा निवडणूक आयोगाने दिल्याने आज शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी तुडुंब गर्दी झाली. १८ डिसेंबरला मतदान, तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंचपदासाठी एकूण दोन हजार ६७७ उमेदवारांचे दोन हजार ७०२ अर्ज, तर सदस्यांसाठी १६ हजार ५२० उमेदवारांनी १६ हजार ६९१ अर्ज दाखल केले. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे गावागावांत आता गटा-तटाची ईर्ष्या पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीसाठी २८ नोव्हेंबरपासून अर्ज दाखल केले जात आहेत. सर्व अर्ज ऑनलाइन भरायचे होते.ऑनलाइन अर्जाला सर्व्हर डाउनचा अडथळा येत असल्याने काल (ता. १)पासून ऑफलाइन अर्ज भरले जात आहेत. त्यामुळे आज मोठ्या इर्ष्येने अर्ज दाखल करायला आलेल्या कार्यकर्त्यांमुळे सरकारी कार्यालयात तोबा गर्दी होती. सरपंच निवड थेट जनतेतून असल्याने यासाठी अर्ज भरणाऱ्या इच्छुक उमेदवारांनीही शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले.जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये आपलाच सरपंच व सत्ता असावी, यासाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना दोन्ही गटांसह इतर पक्ष व गटही प्रयत्न करीत आहेत. महाविकास आघाडी आणि भाजप-शिवसेना (शिंदे गट) यातही चढाओढ असेल. गावात पक्षापेक्षा गटा-तटाचे राजकारण असले, तरीही देश आणि राज्य पातळीवर आपल्याच पक्षाचा उमेदवार सरपंच व्हावा, यासाठी प्रयत्न करीत आहेत.

तालुका - ग्रामपंचायत संख्या - सरपंच उमेदवार आणि अर्ज- सदस्य उमेदवार आणि अर्ज

शाहूवाडी- ४९*२०४-२०४*११५१-११५१

पन्हाळा- ५०*२६०-२६१*१४९९-१५००

हातकणंगले- ३९*३०३-३०५*२४२३-२४४६

शिरोळ - १७*१२२-१२७*८१८-८२२

करवीर -५३*३७४-३७६*२४५९-२५३४

गगनबावडा- २१*८१-८१*३००-३००

राधानगरी- ६६*३८५-३९२*२३४३-२३५८

कागल - २६*१६९-१७५*१२५३-१२५६

भुदरगड - ४३*२४९-२५०*१४२५-१४५६

आजरा - ३६*१६९-१६९*८७४-८७९

गडहिंग्लज - ३४*१९१-१९२*१०५०-१०७१

चंदगड - ४०*१७०-१७०*९२५-९२५

एकूण - ४७४*२६७७-२७०२*१६५२०-१६६९१

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने