प्रणय-राधिका रॉय यांना अदानींवर विश्वास; म्हणाले आता पत्रकारितेची मूल्य...

नवी दिल्ली:  नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड  चे संस्थापक प्रणय रॉय आणि राधिका रॉय  मधील त्यांचे जवळपास सर्व शेअर्स (27.26%) अदानी समूहाकडे हस्तांतरित करतील. यानंतर त्यांच्याकडे फक्त 5% हिस्सा शिल्लक राहील.शुक्रवारी त्यांनी एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. हस्तांतरणामुळे अदानी समूहाचा हिस्सा सध्याच्या 37.45% वरून 64.72% पर्यंत वाढेल.राधिका-प्रणय म्हणाले की, त्यांनी 1988 मध्ये चांगल्या दर्जाची पत्रकारिता करण्यासाठी NDTV ची सुरुवात केली. परंतु ती वाढण्यास आणि त्याचा प्रसार होण्यास प्रभावी साधन आवश्यक होत.ते म्हणाले की, 34 वर्षांनंतर त्यांचा विश्वास आहे की एनडीटीव्ही ही एक संस्था आहे ज्याने त्यांच्या अनेक आशा आणि आदर्श पूर्ण केले आहेत.

राधिका-प्रणयने यांनी सांगितले की, ओपन ऑफरनंतर AMG मीडिया नेटवर्क आता एनडीटीव्हीमधील सर्वात मोठे शेअरहोल्डर आहेत. आम्ही NDTV मधील आमचे बहुतांश शेअर्स AMG मीडिया नेटवर्कला विकण्याचा निर्णय घेतला आहे.ओपन ऑफर लाँच झाल्यापासून गौतम अदानी यांच्याशी त्यांची चर्चा सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
अदानीकडून मूल्ये राखणे अपेक्षित आहे :

राधिका-प्रणय यांनी सांगितले की, गौतम अदानी यांनी त्यांच्या सर्व सूचना सकारात्मक आणि मोकळेपणाने स्वीकारल्या आहेत.गौतम अदानी यांनी विश्वास, विश्वासार्हता आणि स्वातंत्र्य असलेल्या ब्रँडमध्ये गुंतवणूक केली आहे आणि आम्हाला आशा आहे की, ते या मूल्यांचे पालन करतील. अदानी समूहाने ऑगस्टमध्ये NDTV मधील 29.18% हिस्सा खरेदी केला होता.

अदानी समूह हा NDTV मधील सर्वात मोठा शेअरहोल्डर :

या महिन्याच्या सुरुवातीला खुल्या ऑफरनंतर अदानी समूह मीडिया कंपनी न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड  चा सर्वात मोठा भागधारक बनला. अदानी समूहाने ओपन ऑफरद्वारे नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेडमधील आपली हिस्सेदारी 37 टक्क्यांहून अधिक वाढवली होती.अदानी समूह NDTV मधील 26 टक्के हिस्सा घेण्याचा विचार करत होता, परंतु खुल्या ऑफरने केवळ 5.3 दशलक्ष शेअर देऊ केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने