20 हून अधिक मुलींची हत्या करणारा 'बिकिनी किलर' कोण?

नेपाळ: आपण अनेक सीरिअल किलर विषयी वाचलं असेल पण सीरिअल किलरचं नाव घेताच ज्याचं नाव सर्वप्रथम तोंडावर येतं ते म्हणजे फ्रेंच सीरियल किलर चार्ल्स शोभराज . यालाच 'बिकिनी किलर' असेही म्हणतात.नेपाळच्या जेलमध्ये शिक्षा भोगत असणारा हा 'बिकिनी किलर'ची लवकरच सुटका होणार आहे. न्यायालयाने त्याच्या सुटकेचे आदेश दिले आहे. त्यामुळे तो विशेष चर्चेत आलाय. 'बिकिनी किलर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोभराजवर भारत, थायलंड, तुर्की आणि इराणमध्ये 20 हून अधिक लोकांची हत्या केल्याचा आरोप आहे. कोण आहे चार्ल्स शोभराज?

चार्ल्स शोभराज हा गुन्हेगारी क्षेत्रातील खूप मोठा गुन्हेगार आहे. व्हिएतनाममध्ये जन्मलेला हा चार्ल्स शोभराज लबाडी, चोरी आणि फसवणूकीत अव्वल होता. शोभराज विदेशी मुलींशी मैत्री करायचा, त्यांना ड्रग्स द्यायचा आणि त्यानंतर त्यांची हत्या करायचा. त्यांने असे 20 हून अधिक पर्यटकांना ठार मारले आहे. याच्या हत्या प्रकरणात परदेशी मुली टार्गेटवर असायच्या.कोणाच्याही हातात न सापडणारा आणि सर्यास गुन्हे करणारा चार्ल्स खूप धूर्त होता. सर्वत्र त्याची दहशत होती. 1976 ते 1997 या काळात त्याला भारतातील जेलमध्येही ठेवण्यात आले होते. शिक्षा पुर्ण झाल्यावर तो फ्रान्सला गेला त्या नंतर नेपाळ दौऱ्यावर असताना त्याला पुन्हा अटक झाली आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.19 वर्षांपासून नेपाळच्या तुरुंगात शिक्षा भोगत असणारा शोभराज आता सुटण्याच्या मार्गावर आहे. नेपाळ तुरुगांत असताना शोभराज ने एका वीस वर्षीय नेपाळी मुलीशी लग्न केले त्यावेळी चार्ल्स 64 वर्षाचा होता. 

चार्ल्स शोभराजला बिकिनी किलर का म्हणतात?

चार्ल्स शोभराज हा गुन्हेगारी जगतात ‘बिकिनी किलर’ म्हणून ओळखला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का त्याला बिकिनी किलर का म्हटल्या जाते?सत्तरच्या दशकात शोभराजने बऱ्याच थायलंड, नेपाळ आणि भारतातील पर्यटकांची हत्या केली. सुरवातीला मैत्री करणे, त्यांना ड्रग्ज देणे, त्यानंतर त्यांची हत्या करणे आणि त्यांच्या मृतदेहाची क्रुरपणे विल्हेवाट लावणे, यात शोभराज खूप माहीर होता.त्याच्या सर्वाधिक बळी पडलेल्या मुली या बिकीनी घातलेल्या पर्यटक मुली होत्या. एवढंच काय तर तो बिकिनी घातलेल्या मुलींना मारायचा, अशी त्याची ओळख झाली होती. त्यामुळे ‘बिकिनी किलर’ नावाने तो ओळखला जाऊ लागला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने