'दो टके की गंदी औरत..' म्हणणाऱ्या शालीनला 'या' एकाच शब्दात सलमाननं केलं चूप

मुंबई:  बिग बॉस सिझन १६ चा हा आठवडा खूपच वादग्रस्त ठरला. जिथे एकीकडे अर्चनानं कितीतरी वादग्रस्त विधानं केली तिथे दुसरीकडे विकास मानकतलानं थेट जातीवरनं टिका केली. अशामध्ये आता सगळ्यांना प्रतिक्षा होती ती, सलमान खान या आठवड्यात शालीन-अर्चनामधील भांडण आणि विकासनं केलेल्या टीकेवर 'वीकेंड का वार' मध्ये काय बोलतोय याची.'वीकेंड का वार' म्हणजे शु्क्रवारचा वार ...याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. ज्याला पाहून आपण अंदाजा लावू शकतो की एपिसोड किती धमाकेदार होईल. सलमान खान अर्चनावर भलताच रागावलेला दिसत आहे. त्यानं हे देखील म्हटलं की जर तो अर्चनाला शो मध्ये परत आणू शकतो तर एका मिनिटात शो मधनं तिला बाहेरही काढू शकतो. चला जाणून घेऊया बिग बॉस १६ मध्ये ३० डिसेंबरच्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये काय काय पहायला मिळणार आहे.



सलमान खानने अर्चना गौतमची चांगलीच शाळा घेतली. तो म्हणाला,''तू प्रत्येक भांडणात कुणाच्याही आई-वडलांना का मध्ये आणतेस. या तुझ्या हरकतींमुळे तुझी जरादेखील बाहेर इज्जत राहिलेली नाही. जर मी सगळ्यांविरोधात जाऊन तुला शो मध्ये परत आणू शकतो तर घरामधून एका मिनिटात बाहेर काढण्याची ताकदही माझ्यात आहे''. सलमानला इतका लालबूंद झालेला पाहून अर्चना घाबरत घाबरत म्हणाली की सगळे एकत्र तिच्यावर अटॅक करतात अन् तिला काही सूचत नाही मग ती काहीही बोलून बसते.दुसरीकडे सलमान खानने शालीन भनोटच्या कमेंटवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. या आठवड्यात शालीन आणि अर्चनामध्ये जोरदार वाद रंगला होता. या वादात शालीननं अर्चनाला घाणेरडी बाई म्हटलं होतं. यावर अर्चनानं त्याची आई आणि त्याच्या एक्स वाईफवरनं कमेंट केली होती. या भांडणात सुरुावातीला सलमान अर्चनावर भडकला आणि मग शालीनचाही क्लास घेतला.

शालीन भनोटला सलमान खाननं विचारलं की,'तू एका मुलीला 'दो टके की गंदी औरत' असं म्हणूच कसं शकतोस'''. यावर शालीन जोरजोरात ओरडू लागतो आणि म्हणतो की,''मी जे काही बोललो ते तिला बोललो..तिच्या कुटुंबाविषयी नाही. जी व्यक्ती माझ्या आयुष्यात खूप स्पेशल आहे मी त्या व्यक्तीविरोधात काहीच ऐकून घेऊ शकत नाही.'' शालीन भनोटची ही अशी प्रतिक्रिया ऐकून सलमान खानच्या रागाचा पारा मात्र चढलाय. त्यानं काय दम देऊन शालीनसा गप केलंय हे लवकरच कळेल..सध्या या 'वीकेंड का वार' प्रोमोची जोरदार चर्चा रंगलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने