महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही; राज्यपालांचं अमित शहा यांना पत्र

 मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. त्यांच्या विधानांवरुन ते वाद ओढवून घेत आहेत. , छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल कोश्यारी यांनी नुकतंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात वादग्रस्त विधान केलं होतं. महाराजांबद्दल बोलताना ते आता जुने आदर्श झालेत आजचे आदर्श शरद पवार, नितीन गडकरी आहेत असं ते म्हणाले होते. त्यामुळे राज्यभर मोठा वाद निर्माण झाला होता. याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या सर्व प्रकरणावर पत्र लिहालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या बाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला. त्या पार्श्वभूमीवर कोश्यारींनी पहिल्यांदाच सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे.



पत्रामद्धे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणतात की, “महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही”, असं भगतसिंग कोश्यारी यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे. महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही! वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगणं म्हणजे महापुरुषांचा अपमान नव्हे!, असं एक प्रकारे स्पष्टीकरणपर पत्र कोश्यारींनी अमित शाहांना लिहिलं आहे.

पत्रामध्ये ते लिहतात की, माझ्या भाषणातील एक छोटा अंश काढून काही लोकांनी त्याचं भांडवल केलं आहे . मी म्हणालो की, मी शिकत होतो तेव्हा महात्मा गांधीजी, पंडित नेहरुजी, नेताजी सुभाषचंद्र बोस इत्यादींना विद्यार्थी आपले आदर्श मानत होते. हे सारे आदर्श आहेतच पण, युवापिढी वर्तमान पिढीतील आदर्श सुद्धा शोधत असतेच. त्यामुळेच मी असे म्हणालो की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते अगदी अलिकडच्या काळातील नितीन गडकरी हेही आदर्श असू शकतात.दरम्यान हे पत्र कोश्यारींनी 6 डिसेंबर रोजी लिहलेले आहे. म्हणजे 6 दिवसांपूर्वी हे पत्र लिहण्यात आलं होतं. हे पत्र आज जाहीर करण्यात आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने