ठाकरे गटाला दिलासा! शिवशक्ती-भिमशक्तीचा पहिला विजय साकार

अकोला:  राज्याभरातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. विविध पक्षांकडून या निवडणुकीत विजयाचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे गोंधळाचं वातावरण आहे. एकंदरीत भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचा वरचष्मा दिसून येत आहे. मात्र ठाकरे गटासाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.उद्धव ठाकरे सध्या महाविकास आघाडीत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. तेव्हापासून शिवशक्ती-भिमशक्त एकत्र येणार अशा चर्चा होत्या. त्यातच अकोला जिल्ह्यात शिवशक्ती-भिमशक्तीचं खातं उघडलं आहे.उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या 'शिवशक्ती-भिमशक्ती आघाडीची अकोला जिल्ह्यातील बोंदरखेड ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता आली आहे. दोन्ही पक्षांच्या मैत्रीनंतर राज्यात पहिली ग्रामपंचायत ठाकरे-आंबेडकर यांना मिळाली आहे. सरपंचपदी शिवशक्ती-भिमशक्तीचे नंदकिशोर गोरले विजयी झाले असून सर्वच्या सर्व सात सदस्यही विजयी झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने