हुकूमशहाच्या देशात 'तालिबानी शिक्षा'; दक्षिण कोरियाचा चित्रपट पाहणाऱ्या अल्पवयीन मुलांवर झाडल्या गोळ्या

उत्तर कोरिया: हुकूमशहा किम जोंग उनचा देश असलेल्या उत्तर कोरियामध्ये क्रूरतेनं कळस गाठलाय. दक्षिण कोरियाचा चित्रपट  पाहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांची इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय.रेडिओ फ्री एशियानं दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची शिक्षा देण्यात आलीय. डिसेंबर 2020 मध्ये उत्तर कोरिया सरकारनं एक कायदा संमत केला होता. यामध्ये दक्षिण कोरियामधून प्रदर्शित झालेल्या कोणत्याही प्रकारच्या चित्रपटाशी संबंधित सामग्री वापरणं हा गुन्हा ठरवला होता. दरम्यान, याचकारणामुळं अल्पवयीन मुलांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, त्यांचं वय अंदाजे 16 ते 17 वर्षे आहे.दोन अल्पवयीन मुलं ऑक्टोबरच्या सुरुवातीला उत्तर कोरियाच्या रियांगंग प्रांतातील हायस्कूलला भेट देण्यासाठी गेली होती. जी चीनची सीमा आहे. इथं त्यांनी अनेक कोरियन आणि अमेरिकन ड्रामा शो पाहिले, असं द इंडिपेंडंटनं कोरियन मीडियानं म्हटलंय. उत्तर कोरिया सरकारला याची माहिती मिळताच, या दोन्ही अल्पवयीन मुलांना लोकांसमोर आणून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. अल्पवयीन मुलांनी केलेलं कृत्य वाईट होतं, असं सरकारचं म्हणणं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने