‘बिग बॉस मराठी’च्या घरात सिद्धार्थ जाधवची एन्ट्री; आता कोणता नवा ट्वीस्ट येणार?

मुंबई: ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व सुरू झाल्यापासून सदस्यांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचे धक्के मिळत आहेत. या आठवड्यात वाइल्ड कार्डद्वारे राखी सावंत, विशाल निकम, आरोह वेलणकर व मीरा जगन्नाथ या चार सदस्यांनी एन्ट्री घेतली. आता लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणार आहे.

‘कलर्स मराठी’च्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवरुन प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सिद्धार्थ जाधव येणाऱ्या भागात ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणार आहे. पण घरात प्रवेश करताना सिद्धार्थ त्याच्याबरोबर एक नवीन ट्वीस्ट घेऊन आला आहे. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताना सिद्धार्थ त्याच्याबरोबर एका स्पर्धकालाही घेऊन जाणार आहे. सिद्धार्थबरोबर घराबाहेर पडणाऱ्या स्पर्धकाचा प्रवास संपुष्टात येणार आहे.बिग बॉस मराठी’च्या घरात सिद्धार्थला पाहून सगळेच खूश झाले. परंतु, त्याने ट्वीस्टबद्दल माहिती देताच घरातील सदस्यांचे चेहऱ्यावरील रंग उडाल्याचे व्हिडीओत दिसत आहे. यंदाच्या आठवडयात कोणत्या स्पर्धकाचा घरातील प्रवास संपणार हे येणाऱ्या भागात कळेल.दरम्यान, सिद्धार्थ जाधव ‘बालभारती’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने