जगाला 3500 गणितीय सूत्रे देणारे श्रीनिवास रामानुजन बोर्डात दोनदा नापास झालेत!

मुंबई : संपूर्ण जगाला 3500 गणितीय सूत्रे देण्याचे श्रेय श्रीनिवास रामानुजन यांना जाते. त्यांना गणिताचे जादूगार म्हटले जाते. रामानुजन यांच्या गणिताचा अभ्यास पाहून हा विषयच त्यांना घाबरत असेल असे म्हटले जाते. आज गणितीतज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिन आहे. त्यांच्या जन्मदिनादिवशीच राष्ट्रीय गणित दिन साजरा केला जातो.याच पार्श्वभूमीवर आज जाणून घेऊया त्यांची प्रेरणादायी कहाणी. भारतात दरवर्षी 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. तरुण वयापर्यंत त्यांनी जगाला जवळपास 3500 गणिती सूत्रे दिली. रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये तामिळनाडू येथे झाला. त्यांनी लहान वयातच गणित या विषयात ऐतिहासिक कामे करण्यास सुरुवात केली. ते १२ वर्षांचा होते तोपर्यंत त्याने त्रिकोणमितीवर प्रभुत्व मिळवले होते. त्यांनी स्वतःच अनेक प्रमेये विकसित केली होती.श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी तामिळनाडूमधील इरोड येथील ब्राह्मण अय्यंगार कुटुंबात झाला. रामानुजन यांनी कुंभकोणम येथील शासकीय महाविद्यालयात शिक्षण घेतले. मात्र त्यांना गणित सोडून इतर विषयाची आवड नसल्याने ते बारावीच्या परीक्षेत नापास झाले. ज्या महाविद्यालयात ते बारावीत दोनदा नापास झाले. तेच कॉलेज आज रामानुजन यांच्या नावाने ओळखले जाते. त्या कॉलेजचे जूने नाव बदलून रामानुजन यांचे नाव देण्यात आले आहे.लहान वयापासून ते अगदी इंजिनिअरिंगच्या अभ्यासापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना गणित अवघड वाटते. अनेकजण त्यामूळे नापासही होतात. पण, अगदी बालवयापासूनच रामानुजन यांना गणिताची इतकी आवड होती. की ते गणितात पूर्ण गुण मिळवायचे. आणि इतर विषयात नापास व्हायचे.

गणितातील योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारकडून अनेक सन्मान मिळाले आहेत. गणिताशी संबंधित अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. विशेष म्हणजे त्यांनी गणित शिकण्यासाठी कोणतेही विशेष प्रशिक्षण घेतले नाही. रामानुजन यांचा पहिला शोधनिबंध ‘बर्नौली संख्यांकाचे गुणधर्म’ हा शोधनिबंध जर्नल ऑफ इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीमध्ये प्रकाशित झाला. 26 एप्रिल 1920 रोजी वयाच्या 33 व्या वर्षी क्षयरोगामुळे त्यांचे निधन झाले.रामानुजनांची बहुतेक कामे न उलगडणारे कोडे आहेत. त्यांचे केलेले अनेक संशोधने आजही शास्त्रज्ञांसाठी एक न सुटलेले कोडेच आहेत. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या रामानुजन यांनी त्यांच्या या कामातून भारताला अपार वैभव मिळवून दिले. त्यांचे एक जुने रजिस्टर 1976 मध्ये ट्रिनिटी कॉलेजच्या ग्रंथालयात अचानक सापडले. त्यामध्ये ते गणिते, प्रमेय आणि सूत्रे लिहीत असत.

सुमारे शंभर पानांचे हे रजिस्टर आजही शास्त्रज्ञांसाठी एक कोडेच आहे. हे रजिस्टर नंतर ‘रामानुजन नोट बुक’ म्हणून ओळखले जाऊ लागले. मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चनेही ते प्रकाशित केले आहे.रामानुजन यांच्या संशोधनाप्रमाणेच त्यांची गणितात काम करण्याची शैलीही विचित्र होती. कधी कधी तो मध्यरात्री झोपेतून उठायचे आणि पाटीवर गणिते सोडवत बसायचे. 1918 मध्ये, रामानुजन केंब्रिज फिलॉसॉफिकल सोसायटी, रॉयल सोसायटी आणि ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिजचे फेलो म्हणून निवडले गेले. 1919 मध्ये ते भारतात परतले. श्रीनिवास रामानुजन यांचे 26 एप्रिल 1920 रोजी क्षयरोगामुळे वयाच्या 33 व्या वर्षी निधन झाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने