अवघ्या २३व्या वर्षी दुमजली गोठा उभारून यशस्वी डेअरी व्यवसाय करणारी 'श्रद्धा'

अहमदनगर: आज राष्ट्रीय शेतकरी दिवस. भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचा जन्मदिन राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो. पण देशातील शेतकरी समृद्ध झाला की देशाच्या प्रगतीला गती मिळेल हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. तरूण मुलं मुली शेतीत उतरले पाहिजे असं अनेकजण बोलतात पण प्रत्यक्षात मात्र शेतीत आधुनिकतेला धरून प्रयोग करणाऱ्या तरूणांची संख्या कमी आहे. पण वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी म्हशींसाठी दुमजली गोठा उभारून यशस्वी दुग्धव्यवसाय अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील श्रद्धा ढवण या मुलीने करून दाखवलाय. राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त जाणून घेऊया तिचा यशस्वी प्रवास.श्रद्धा ढवण ही अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज या गावची. घरची परिस्थिती पहिल्यापासूनच बेताची होती. वडील अपंग, भावंडं लहान त्यामुळे घरात जबाबदार व्यक्ती दुसरी कोणीच नाही. त्यामुळे सगळी जबाबदारी श्रद्धावर येऊन ठेपली. त्यामुळे घरी असलेल्या म्हशींची जबाबदारी तिच्यावर पडली. त्यामुळे कॉलेजला गेल्यापासूनच तिने घरच्या दुधाचा व्यवसाय सांभाळला. जेव्हा मुलं कॉलेजला जायचे तेव्हा श्रद्धा दुध घालायला जायची.

सुरूवातीला दूध घालायला जाताना लाज वाटत होती असं तिने सांगितलं. कारण तिचे सगळे मित्र कॉलेजला जात होते आणि ती पिकअप चालवत दूध पोहचवायला जायची. पण नंतर जेव्हा तिच्याबद्दल लोकं चांगलं बोलू लागले तेव्हा तिला चांगलं वाटायचं. पुढे तिने या व्यवसायात प्रगती करायचं ठरवलं. त्यांच्या घरी सुरूवातील एकच म्हैस होती. ती घराजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला बांधली जायची. पण या व्यवसाय वाढून तिने ८० म्हशीपर्यंत नेला आहे.

घर सांभाळता सांभाळता हा व्यवसाय वाढवता यावा यासाठी तिने कोणत्याही शहरात शिक्षणासाठी जायचा प्लॅन केला नाही. तर निघोज या गावातूनच Bscचं शिक्षण घेतलं आणि घरचा दुधाचा व्यवसाय वाढवायचं ठरवलं. तिने स्वत:च्या हाताने म्हशीचं दुध काढून हा व्यवसाय वाढवत जिल्ह्यात प्रथमच दुमजली म्हशींचा गोठा बांधला. तर ती आता सक्षमपणे हा गोठा सांभाळत आहे. तिच्याकडे आत्ता जवळपास ८० पेक्षा जास्त म्हशी असून ती अनेक शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसायाचे प्रशिक्षण देते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने