“आम्ही मूव्ह ऑन…”; वीणा जगतापशी असलेल्या नात्याबद्दल पहिल्यांदाच बिग बॉसमध्ये बोलला शिव ठाकरे

मुंबई : बिग बॉस हिंदीचं १६ वं पर्व दिवसेंदिवस मनोरंजन होत आहे. या आठवड्यात शोमध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले. मराठमोळा शिव ठाकरे शोमध्ये त्याची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापमुळे चर्चेत आहे. शोमध्ये विकेंड का वारनंतर बिग बॉसनी घरातील सदस्यांना कन्फेशन रुममध्ये बोलवून चर्चा केली होती. त्यावेळी बोलताना शिव रडू लागला आणि त्याने रडत वीणाचं नाव घेतलं होतं. खरं तर शिव व वीणाचा ब्रेक अप झाल्याचं म्हटलं जात होतं. पण अशातच शिवने वीणाचं नाव घेतल्याने दोघांचं खरंच ब्रेक अप झालंय की नाही याबद्दल चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात शिव वीणाबद्दल बोलला आहे.बिग बॉस १६ च्या ७ डिसेंबरच्या एपिसोडमध्ये, शिव ठाकरेने बिग बॉस मराठीत त्याची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापबद्दल पहिल्यांदाच बोललाय. तो शोमधील सह-स्पर्धक वीणा जगतापच्या प्रेमात पडला होता आणि नंतर ते रिलेशनशिपमध्ये होते. चाहत्यांनाही त्यांची जोडी खूप पसंतीस पडली होती. या एपिसोडमध्ये, शिवने उघड केलं की त्यांचं ब्रेकअप होऊन आता सात महिने झाले आहेत, पण अजूनही ते मूव्ह ऑन करू शकलेले नाहीत.शिव टिना दत्ता आणि साजिद खानशी बोलत असतो. त्यावेळी तो वीणाबरोबर प्रेमात पडला, तेव्हाच्या आठवणी सांगतो. तसेच ब्रेक अप बद्दल बोलताना तो भावूक झाल्याचं पाहायला मिळतं. सात महिन्यांपूर्वी आमचं ब्रेक अप झालं होतं, पण आम्ही मूव्ह ऑन नाही करू शकलो. तिने स्वतःला कामात गुंतवण्याचा प्रयत्न केला. मी स्वतःला वचन दिलं होतं की जे आधीच्या रिअॅलिटी शोमध्ये झालं ते पुन्हा होणार नाही.तो पुढे म्हणाला, “संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांना माझं नाव माहीत आहे, त्यांना वीणाचं नाव माहीत आहे आणि जे वीणाला ओळखतात ते मला ओळखतात. मी बॉडीबिल्डर आहे, मला शरीरावर टॅटू काढायला आवडत नाही, पण मी वीणासाठी टॅटू काढला होता. या घरात बाहेरच्या जगासारख्या प्रॅक्टिकल गोष्टी होऊ शकत नाही.”

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने