...तर पोलीस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील; आव्हाडांनी नाकारलं CM शिंदेंचं आमंत्रण

मुंबई: गेल्या काही दिवसा अगोदर कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. त्यामुळं आव्हाडांना प्रचंड टीकेला सामोरो जावे लागले होते. आणि त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल केला. त्यामुळे आता आव्हाड चांगलेच सावध झाल्याचे पाहिला मिळत आहेत.



आज ठाणे महापालिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काही योजनांचे शुभारंभ आहे. या कार्यक्रमासाथी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना देखील आमंत्रन देण्यात आलं आहे. मात्र यावेळेस कार्यक्रमाला जितेंद्र आव्हाड जाणार नाही.अशी माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे. तर ट्विट करताना मात्र एकनाथ शिंदे यांना नाव न घेता टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, "आज ठाणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचे शुभारंभ आहे, आमंत्रण दिले आहे महापालिकेनी पण ब्रिजच्या उद्घाटनात त्यांच्या ८ फूट अंतरावर असताना माझ्यावर ३५४ चा गुन्हा दाखल झाला ते स्वतः साक्षीदार आहेत.

आज त्यांच्या बाजुला उभा राहीन आणि पोलिस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील त्या पेक्षा कार्यक्रमाला न गेलेले बरं परत पोलिस म्हणतील दबाव होता आणि सीएम म्हणतील तुला माहीत आहेना मी हे करू शकत नाही .. तुला कस कळत नाही .. खरच कळत नाही …चलो ये वक्त भी गुजर जयेगा ..u too brutas" त्यामुळे आता आव्हाड चांगलेच सावध झाल्येचे दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने