टीना दत्ताला मोठा झटका! बिग बॉसने दाखवला बाहेरचा रस्ता?

मुंबई: रिअलिटी शो 'बिग बॉस 16' आता जास्तचं मनोरंजक झाला आहे. आता या शोबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. घरातील तगडी स्पर्धक टीना दत्ताला या आठवड्यात घरातुन बाहेर जावं लागणार असा दावा करण्यात आला आहे. ती या आठवड्यात नॉमिनेट झालेली होती. तिच्यासोबत निमृत कौर अहलुवालिया, सुंबूल तौकीर खान आणि एमसी स्टॅन यांनाही नॉमिनेट करण्यात आलं होतं.तेव्हापासूनच टिना दत्ता सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. त्यातच बाहेर पडण्याच्या वृत्ताने काहींना आनंद झाला तर अनेकांना दुःख झाले. आजच्या वीकेंड का वार मध्ये, सलमान खान टीनाचा क्लास देखील घेणार आहे, ज्यामुळे ती शोमध्ये रडतांनाही दिसणार आहे.टीना दत्ता बेदखल झाल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. दरम्यान चॅनेल किंवा निर्मात्यांकडून याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाही. आजच्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये सलमान खान घराबाहेरच्या गोष्टीवर घरात चर्चा केल्यामूळं टीना दत्ताचा क्लास घेणार आहे. तिला काही प्रॉब्लेम आहे का असं विचारल्यानंतर ती रडते. त्यानंतर ती कन्फेशन रूममध्ये जाते आणि सांगते की ती आता हे नाही करू शकत.

दरम्यान, टीनाला बाहेर काढल्याची बातमी ऐकल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक असेही म्हणत आहेत की टीनाला हाकलून दिलं जाणार नाही, तर तिला सिक्रेट रुममध्ये पाठवलं जाऊ शकतं. तर अनेक लोक टीना दत्ताच्या समर्थनातही आहेत. टीनाची अवस्था पाहून त्यांना वाईटही वाटत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने