कंगना साकारणार 'चंद्रमुखी'; झळकणार रजनीकांत यांच्या दाक्षिणात्य चित्रपटात..

मुंबई: आपल्या बिनधास्त आणि परखड वक्तव्यामुळे कायम चर्चेत असणारी कंगना राणौत ही नेहमीच नेपोटिजम किंवा राजकारण याविषयी भाष्य करते. त्यामुळे कंगना आणि वाद हे एक समीकरणच झाले आहे. कंगनाला न पटणाऱ्या गोष्टींवर ती सातत्याने टीका करते असते. सध्या तिचे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत असून सर्वत्र कंगनाची हवा आहे. लवकरच तिचा 'एमरजन्सी' हा इंदिरा गांधी यांचा बायोपिक रिलीज होणार आहे. तर आता तिच्या दाक्षिणात्य चित्रपटाबाबत चर्चा सुरू झाली आहे.नुकतीच कंगनानं तिच्या आगामी चित्रपटाबाबत खुलासा केला आहे. कंगना आता दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. ज्या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं अशा 'चंद्रमुखी' या तमिळ चित्रपटाचा सिक्वेल (Chandramukhi 2) येत आहे, ज्यामध्ये कंगना प्रमुख भूमिकेत आहे.ज्योतिका सरवनन आणि रजनीकांतयांचा चंद्रमुखी हा चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तमिळ हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाला इतकी प्रसिद्धी मिळाली की, हिंदीतही त्याचा रिमेक झाला. आता या चित्रपटाचा दूसरा भाग येत आहे.

कंगनानं नुकतीच एक पोस्ट शेयर केली. ज्यामध्ये 'पी वासूजी यांच्या तमिळ चित्रपटात काम करण्यास मी उत्सुक आहे.' असे म्हंटले आहे. त्यामुळे कंगनाला चंद्रमुखीच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.अभिनेत आणि चित्रपट निर्माता राघव लॉरेंस यांनी 'चंद्रमुखी-2' चित्रपटाबाबत एक ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये ते अभिनेते रजनीकांत यांचा आशीर्वाद घेताना दिसत आहेत. 'रजनीकांत यांचा आशीर्वाद घेऊन आज म्हैसूरमध्ये 'चंद्रमुखी 2' च्या शूटिंगला सुरुवात करत आहे.' असं त्यांनी पोस्टमध्ये म्हंटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने