कधी अन् कुठे पाहता येणार 'शार्क टँक इंडिया'चा दुसरा सीझन?

मुंबई : भारतातील आणि पहिला व्यवसायिक रिअलिटी शो 'शार्क टँक इंडिया' चा पहिला सिझन सर्वात यशस्वी झाला. अनेक तरुणांना या शोमार्फत आपला व्यवसाय वाढविण्यास प्रोत्साहन मिळाले तर काहींना आर्थिक मदतही करण्यात आली. या शोचा पहिला सिझन खुप लोकप्रिय झाला. या शोची लोकप्रियता पाहिल्यानंतर आता या शोचा दुसरा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.नुकतीच, शोच्या निर्मात्यांनी आगामी सीझनबद्दल एक घोषणा केली आहे. त्यामूळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. शोचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे, मागच्या वेळेप्रमाणेच यावेळी देखील अनुपम मित्तल आणि अमन गुप्ता सारखे शार्क लोकांना गुंतवणूक आणि स्टार्टअपचे नव नवीन फंडे समजावून सांगताना दिसतील. कोरोना महामारीनंतर 2021 मध्ये पहिल्यांदाच आलेल्या या शोने देशातील लोकांना स्टार्टअप्सबद्दल खुप महत्वाची माहिती दिली.पुढील वर्षी म्हणजेच 2 जानेवारी 2023 रोजी प्रसारित केली जाईल. शार्क टँक इंडिया सीझन 2 या वेळी 2 जानेवारी 2023 पासून सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता फक्त Sony TV आणि SonyLIV प्रीमियर दाखविण्यात येइल. शार्क टँक इंडियाचा दुसरा सीझन सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता सोनी टेलिव्हिजन वाहिनीवर दाखवला जाईल. हा शो अमिताभ बच्चनचा शो 'कौन बनेगा करोडपती 14' ची जागा घेईल. केबीसी हा शो डिसेंबरमध्येच संपणार असल्याचं स्पष्ट झाले आहे.महत्वाची बाब म्हणजे, यावेळी अश्नीर ग्रोव्हर या शोमध्ये शार्क म्हणून दिसणार नाही पण यावेळी शार्क टँक 2 मधील शार्क शादी डॉट कॉमचे संस्थापक आणि सीईओ - पीपल ग्रुप अनुपम मित्तल, बॉटचे सह-संस्थापक आणि सीएमओ अमन गुप्ता , Emcure फार्मास्युटिकल्सच्या कार्यकारी संचालिका नमिता थापर तसचं शुगर कॉस्मेटिक्सच्या सह-संस्थापक आणि CEO विनिता सिंग ,Lenskart.com चे संस्थापक आणि CEO पियुष बन्सल आणि CarDekho GroupचेCEO आणि सह-संस्थापक अमित जैन हे असणार आहे तर राहुल दुआ हा शो होस्ट करणार आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने