दंगलीतील आरोपी उमर खालिदची तिहार तुरुंगातून सुटका; 'या' कारणासाठी 7 दिवसांचा जामीन मंजूर

दिल्ली : दिल्ली दंगलीत  मोठा कट रचल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या उमर खालिदच्या  बहिणीचं लग्न ठरलंय. या कारणास्तव उमरनं दिल्लीच्या कर्करडूमा न्यायालयात  जामीन अर्ज दाखल केला होता. ही याचिका ग्राह्य धरून न्यायालयानं त्याला आठवडाभरासाठी जामीन मंजूर केलाय.न्यायालयाचा आदेश मिळताच, आज (शुक्रवार) सकाळी त्याची तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली. उमरच्या सुटकेची बातमी समजताच तुरुंगाबाहेर अनेक लोक त्याला भेटायला आले होते.तुरुंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कोर्टाकडून एक आठवड्याचा जामीन मिळाला आहे. उमर खालिदला 23 डिसेंबरला सकाळी 7 वाजता तिहारमधून सोडण्यात आलं. बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी त्याला हा जामीन मिळाला. जामिनाच्या अटींनुसार, उमरला 30 डिसेंबरला परत तुरुंगात यावं लागणार आहे.''या' अटींसह मिळाला जामीन

न्यायालयानं खालिदला अनेक अटींसह जामीन मंजूर केला आहे. त्या अंतर्गत तो कोणत्याही साक्षीदाराशी संपर्क साधू शकणार नाही. याशिवाय, तो पुराव्यांशी छेडछाडही करणार नाही. खालिदला त्याचा फोन नंबर तपास अधिकाऱ्यांना द्यावा लागणार असून अंतरिम जामीन मिळेपर्यंत तो क्रमांक चालू राहील. शिवाय, उमर दररोज तपास अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉल करेल.

उमर 27 महिन्यांपासून तुरुंगात

फेब्रुवारी 2020 मध्ये सीएए आणि एनआरसीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात ईशान्य दिल्लीत हिंसाचार उसळला होता. या दंगलीत 53 लोकांचा मृत्यू झाला, तर 700 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी उमरला सप्टेंबर 2020 मध्ये अटक करण्यात आली होती. तो गेल्या 27 महिन्यांपासून तुरुंगात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने