'नव्या वर्षात सगळी secretes उलगडतील..', स्वप्निल जोशीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

मुंबई: परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' सिनेमाची जेव्हापासून घोषणा झाली तेव्हापासूनच सिनेमाविषयीची उत्सुकता निर्माण झाली. सिनेमाच्या टीझरने तर अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेयत. खरंतर सिनेमाचा जॉनर काय असेल यावरनं जोरदार चर्चा रंगलेली दिसली. सिनेमा थ्रिलर असेल की रोमॅंटिक की कॉमेडी असे अनेक प्रश्न त्या टीझरवर चाहत्यांनी सिनेमाच्या टीमला विचारले आहेत.आता सिनेमाचं कथानक कशावर आधारित आहे हे रीलिजनंतर कळेलच तोपर्यंत उत्सुकतेचा गोंधळ मात्र कायम असणार आहे. पण त्याचं झालं असं की आता पुन्हा सिनेमाचा एक नवा टीझर सोशल मीडियावर पोस्ट केला गेला अन् चाहत्यांना नव्या प्रश्नांनी घेरलं.. स्वप्निल जोशीनं आपल्या इन्स्टाग्रामवर वाळवीचा एक नवीन टीझर पोस्ट केला. ज्यात दिसत आहे की त्याच्या एका हातात पिझ्झा आहे आणि एका हातात फावडा...आता हे नक्की काय चाललंय स्वप्निलचं काही कळेना. पिझ्झा खाताना त्यानं फावडा का पकडलाय...नेमकं काय करायचंय त्याला...असे अनेक प्रश्न स्वप्निलला लोक विचारताना दिसतायत..स्वप्निलनं झी स्टुडिओच्या या शेअर केलेल्या पोस्टला कॅप्शन दिलं आहे की...''एका हातात पिझ्झा,दुसऱ्या हातात फावडं...स्वप्निल जोशी सोबत नेमकं घडतंय काय? नव्या वर्षात सगळी सीक्रेट्स उलगडतील...वाळवी १३ जानेवारी २०२३ पासून प्रदर्शित.. ''अशी एकंदरीत पोस्ट आहे.

'वाळवी' सिनेमात स्वप्निल जोशी,सुबोध भावे, अनिता दाते,शिवानी सुर्वे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. परेश मोकाशी या सिनेमाचं दिग्दर्शन करत असल्यानं यावेळीही एक नवं कथानक थिएटरकडे पावलं वळवायला मजबूर करेल अशी आशा सध्या तरी निर्माण झालीय. परेशच्या 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'एलिझाबेथ एकादशी', 'चि व चि.सौ.का' या सिनेमांनी त्याचा असा एक मोठा चाहतावर्ग आधीच निर्माण केला आहे. त्यामुळे 'वाळवी' सारखा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणून परेश पुन्हा एकदा चाहत्यांच्या अपेक्षांना खरा उतरतो का याची चर्चा आता रंगली आहे..

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने