चक्क ‘बिग बॉस’नेच घरामध्ये केला प्रवेश, पहिल्यांदाच असं काही घडलं की सदस्यही बघतच बसले

मुंबई: बिग बॉस १६’ सध्या रंजक वळणावर आहे. ‘बिग बॉस’च्या १६व्या सीझनमध्ये प्रेक्षकांना नवीन ट्विस्ट अनुभवायला मिळाले. या सीझनची खासियत म्हणते ‘बिग बॉस’ स्वतः विशेष टिपणी करत सदस्यांबरोबर हा खेळ खेळत आहेत. पण जर ‘बिग बॉस’ स्वतः घरामध्ये आले तर… हो असंच आता या सीझनच्या नव्या भागामध्ये घडणार आहे.‘बिग बॉस’च्या घरामध्ये ऐकू येत असल्याचा आवाज नेमका कोणाचा? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. विजय विक्रम सिंह हे ‘बिग बॉस’चा आवाज आहेत. विजय सिंह यांनीच आता घरामध्ये एण्ट्री केली आहे. आता या शोमध्ये नवा ट्विस्ट आला आहे.
येत्या भागामध्ये घरात आलेल्या पाहुण्यांकडे सदस्यांना दुर्लक्ष करायचं आहे. घरातील खाण्याचं सामान परत मिळवायचं असेल तर सदस्यांना हे काम करावं लागणार आहे. विजय सिंहही पाहुणे म्हणूनच घरात प्रवेश करतात. पण त्यांना घरातील सदस्यांनी ओळखलं की नाही हाही मोठा प्रश्न आहे.विक्रम सिंह घरात आल्यानंतर सुम्बूल तौकीरला तिच्या वडिलांनी लिहिलेलं पत्र वाचून दाखवत आहेत. विक्रम यांनी ‘बिग बॉस’च्या जवळपास १४ सीझनला त्यांचा आवाज दिला आहे. त्यांच्या आवाजाचेही आज हजारो चाहते आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने