'ब्राह्मणांनो, हरियाणा सोडा'; JNU नंतर खलिस्तान समर्थनार्थ काॅलेजच्या भिंतींवर लिहिल्या घोषणा

हरियाणा: हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील  पंजाब सीमेवर वसलेल्या डबवालीमध्ये पुन्हा एकदा खलिस्तान समर्थनार्थ घोषणा लिहिल्या आहेत. डॉ. भीमराव आंबेडकर शासकीय महाविद्यालयाच्या भिंतींवर सहा ठिकाणी खलिस्तान समर्थनार्थ घोषणा लिहिण्यात आल्या आहेत.यामध्ये 'ब्राह्मणांनो, हरियाणा सोडा' असा नारा लिहिला आहे. गुरपतवंत सिंग पन्नू आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये हरियाणाला पंजाबचा  भाग म्हणून वर्णन करण्यात आलं आहे. परिसरातील सामाजिक सलोखा बिघडविण्याच्या उद्देशानं अमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी आणि लोकांकडून हे अवैध कृत्य केलं जात असल्याची भीती व्यक्त होत आहे.
सिरसाची डबवाली राजस्थान आणि पंजाब सीमेवर आहे. अशा परिस्थितीत डबवाली पोलीस राजस्थान आणि पंजाबमध्येही याचा तपास करू शकतात. बी. आर. आंबेडकर महाविद्यालयाच्या भिंतींवर सहा ठिकाणी या घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. डबवालीचे डीएसपी कुलदीप बेनिवाल यांनी सांगितलं की, 'गुरपतवंतचा व्हिडिओ आणि भिंतीवर संदेश लिहिणाऱ्या व्यक्तीची चौकशी करण्यात येत आहे. अशा प्रकरणांमध्ये सक्रिय आणि तुरुंगात असलेले लोक आणि त्यांच्या संपर्कात असलेल्यांची चौकशी करून प्रकरणाचा खुलासा केला जाईल.'डीएसपी बेनिवाल म्हणाले, या प्रकरणाची प्रत्येक बाजूनं चौकशी केली जात आहे. कॉलेजच्या बाहेर सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाहीत, त्यामुळं आरोपींची ओळख अद्याप पटलेली नाही. यापूर्वी समाजकंटकांनी जेएनयूच्या भिंतींवर ब्राह्मणांविरोधात अमर्याद घोषणा लिहिल्या होत्या. यात काही घोषणा अतिशय प्रक्षोभक होत्या, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने