म्हणून व्हॉट्सअ‍ॅपने बंद केले तब्बल २३ लाख भारतीय अकाउंट, तुमचा नंबर तर यात नाही?

मुंबई: इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने एका महिन्यात २३ लाखांपेक्षा जास्त भारतीय अकाउंट बंद केले आहेत. १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. यूजर्सने तक्रार केल्यानंतर अकाउंट्सला बंद करण्यात आले आहे. याआधी सप्टेंबर महिन्यात कंपनीने २६ लाखांपेक्षा जास्त अकाउंट बॅन केले होते. आयटी अ‍ॅक्ट २०२१ अंतर्गत जारी केल्या जाणाऱ्या मासिक रिपोर्टमध्ये कंपनीने ही माहिती दिली आहे.

कंपनीने माहिती दिली की, त्यांच्याकडे ७०१ तक्रारी आल्या होत्या, ज्यानंतर ३४ अकाउंट्सवर कारवाई केली. तसेच, २३ लाख अकाउंट्सपैकी ८,११,००० अकाउंट्सला यूजर्सच्या तक्रारीनंतर बॅन करण्यात आले आहे. या अकाउंट्सला कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने बंद करण्यात आले आहे. कंपनीनुसार, यूजर्सच्या सुरक्षेसाठी सातत्याने काम केले जात आहे. कंपनी आता आर्टिफिशियल इंटेलिजेंस, स्टेट ऑफ द आर्ट टेक्नोलॉजी, डेटा सायटिंस्ट आणि एक्सपर्ट्स-प्रोसेसमध्ये देखील गुंतवणूक करत आहे.आयटी नियमांतर्गत यूजर्सची सुरक्षा लक्षात घेऊन या अकाउंट्सवर कारवाई करण्यात आली आहे. आयटी अ‍ॅक्ट २०२१ अंतर्गत ५० लाखांपेक्षा जास्त यूजर्स असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला आयटी मंत्रालयाकडे यूजर सेफ्टी रिपोर्ट द्यावा लागतो.



सप्टेंबर महिन्यात २६ लाख अकाउंट्स केले बंद

कंपनीने सप्टेंबर महिन्यात भारतात २६.८५ लाख व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्स बंद केले आहेत. यातील ८.७२ लाख अकाउंट्सला यूजर्सने रिपोर्ट केल्यानंतर बंद करण्यात आले. कंपनीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, १ सप्टेंबर २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२ दरम्यान २६,८५,००० अकाउंट्सला बंद करण्यात आले.

तुम्ही देखील करू शकता रिपोर्ट

जर एखादी व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून तुमच्याशी चुकीचा व्यवहार करत असल्यास त्या नंबरला रिपोर्ट करू शकता. काहीवेळा यूजर्सला पुरावा म्हणून स्क्रीनशॉट देखील शेअर करावा लागतो. याव्यतिरिक्त तुम्ही अशा नंबर्सला ब्लॉक करू शकता. एखाद्या यूजरला रिपोर्ट करायचे असल्यास सेंडरच्या मेसेजवर लाँग प्रेस करा, त्यानंतर तीन डॉटवर क्लिक करा. येथे तुम्हाला रिपोर्टचा पर्याय मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने