दोनदा लग्न दोनदा घटस्फोट आता तिसरीची तयारी...

मुंबई: आमिर खान हा बॉलीवूडचा सुपरस्टार ,ज्याला फिल्मी दुनियेत मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जाते. आमिर खान जितका त्याच्या चित्रपटामूळं कमी आणि त्याच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत असतो. आमिर खानने दोन लग्नं केली आहेत पण आजच्या काळात तो स्वत:ला सिंगल असल्याचं सांगतोय. मात्र अजूनही तो एका अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा आहे.सध्या आमिर खान आणि त्याची एक्स वाईफ किरण राव बरोबर त्याच्या प्रॉडक्शनच्या ऑफिसमध्ये कलश पुजा करताना दिसत आहे. त्या कलश पुजेवरून आमिर खान ट्रोल तर होत आहे. त्यातच त्यांचा डिव्होर्स झाला आहे की नाही? हा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. कारण तो तिच्या सोबत दिसतं आहे. मात्र किरण ही त्यांची एक्स वाईफ आहे तरी तो तिच्यासोबत दिसंत आहे मग तो त्याच्या पहिल्या बायकोसोबत का दिसत नाही असा सवालही नेटकरी विचारत आहे.आमिरच्या पहिल्या बायकोचं नाव होतं रिना दत्ता.. आमिर खान आणि रीना दत्ता यांची लव्ह लाईफ इंटरेस्टिंग होती. असं म्हटलं जातं की आमिर आणि रीनाचं घर जवळच होतं आणि आमिरचं पहिल्या नजरेत रीना दत्तावर प्रेम जडलं. आमिर त्या दिवसात रीना दत्ताच्या प्रेमात खुपचं वेडा झाला होता. त्याने तिला आपल्या रक्ताने प्रेमपत्रही लिहिलं होते. इतकेच नव्हे तर दोघांनी गुपचुप लग्न केलं. त्यानंतर 18 एप्रिल 1986 रोजी त्यांनी रीनाशी रितसर पध्दतीने लग्न केले. पण नंतर आमिर खानचे चित्रपट फ्लॉप होत होते आणि तो डिप्रेशन मध्ये गेला होता‌ त्या दरम्यान त्याच रिना दत्तबरोबर जमत नव्हतं .त्यानंतर 2002 मध्ये आमिर-रीनाने घटस्फोट घेतला.

मग त्याच्या लव्हलाईफमध्ये किरण रावची एंट्री झाली. ते झालं असं की मधल्या काळात आमिर खानचे चित्रपट फ्लॉप होत होते त्यावेळी तो डिप्रेशन मध्ये गेला. तेव्हा त्याला किरण रावची साथ मिळाली. लगान चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमिरचं नाव किरणसोबत जोडलं जाऊ लागलं. त्यावेळी किरणसोबत आमिरच्या लिंकअपच्या बातम्यांमुळे रीना दत्ता चांगलीच नाराज झाली होती. त्यांच्या अफेअरची बातमी इंडस्ट्रीत आगीसारखी पसरली. अखेर आमिर खान आणि किरण रावने 2005 मध्ये किरण रावशी लग्न केले. २०११ मध्ये या दोघाना सरोगसी पद्धतीने एक मुलगा झाला. मात्र किरण राव बरोबर १५ वर्षे संसार केल्या नंतर गेल्या वर्षी आमिर खान आणि किरण राव यांचा डिव्होर्स झाला आमिर आणि किरणने 2021 मध्ये घटस्फोटाची घोषणा केली होती.

आता आमिरचं नावं दबंग गर्ल फातिमा सना शेख हिच्यासोबत जोडलं जात आहे. फातिमा 'दंगल' चित्रपटात आमिर खानच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती, 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या लिंक-अपच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. आमिर खानने आणि फातिमा सना शेखला डेट करायला सुरुवात केली. घांचे एकत्र फोटोही व्हायरल झाले होते. ज्यामध्ये दोघेही हात हातात धरलेले दिसत होते. त्यानंतर आमिरच्या मूलीच्या साखरपुड्यातही फातिमा दिसली होती. त्यामूळे दोघांच्या लिंकअपच्या चर्चांना पुन्हा उधान आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने