हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ; शरद पवारांच्या नेतृत्त्वात मोर्चा

नागपूर : हिवाळी अधिवेशन पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्त्वात विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. एक लाखावर कार्यकर्त मोर्चात सहभागी होणार असल्याचे नमूद करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजीमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अधिवेशन पहिल्या दिवसापासूनच वादळी होण्याचे स्पष्ट संकेत दिले.येत्या १९ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. राज्यातील एकूण स्थिती बघता अधिवेशन चांगलेच गाजणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोर्चाच्या तयारीसंदर्भात आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष दिलीप वळसे पाटील आज नागपुरात आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलत होते. शेतकऱ्यांच्या समस्या, वाढती बेरोजगारी, परराज्यात जात असलेले प्रकल्प, शेतकरी आत्महत्या या संवेदनशील मुद्द्यांवर सरकारला जाब विचारण्यासाठी राज्यभरातून एक लाख कार्यकर्ते येणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.



शिवरायांविरोधातील वक्तव्ये जाणीवपूर्वक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजप नेत्यांच्या वक्तव्याची वक्तव्ये जाणीवपूर्वक महाराष्ट्राचा अपमान करण्यासाठी केली जात आहे काय, हे तपासून बघण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी काल महिला मुख्यमंत्रीपदाबाबत सूतोवाच केले होते, त्यानुसार सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार आहे काय, या प्रश्नाला मात्र त्यांनी काहीही चर्चा करता येणार नाही, असे नमुद करीत बगल दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने