गुंडागर्दीची हद्दच! 100 हून अधिक तरुणांनी घरात घुसून डाॅक्टर मुलीला नेलं पळवून; कारण जाणून धक्काच बसेल!

तेलंगणा: तेलंगणाच्या रंगा रेड्डी जिल्ह्यातील आदिबाटला इथं एका 24 वर्षीय महिलेचं तिच्या घरातून अपहरण करण्यात आलं. तिचं अपहरण करण्यासाठी किमान 100 लोक तिच्या घरात घुसले आणि जबरदस्तीनं तिला घेऊन गेले.वैशालीच्या पालकांनी सांगितलं की, जवळ-जवळ 100 पुरुष आमच्या घरात घुसले आणि त्यांनी घरातील सामनाची तोडफोड केली. शिवाय, त्या लोकांनी माझ्या मुलीला जबरदस्तीनं घेऊन गेले. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तरुण महिलेच्या कुटुंबीयांना मारहाण करताना दिसत आहेत. याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केलाय.तेलंगणाच्या राजधानीजवळ असलेल्या आदिबाटला भागात ही घटना घडली. महिला दंतचिकित्सक असल्याचं सांगितलं जात आहे. "हत्येचा प्रयत्न आणि अपहरणाच्या आरोपाखाली आतापर्यंत एकूण 16 जणांना अटक करण्यात आलीय. सहा तासांत महिलेची सुटका करण्यात आली," असं राचकोंडाचे पोलिस  आयुक्त महेश बागवत यांनी सांगितलं. मुख्य आरोपी नवीन रेड्डीनं पोलिसांना सांगितलं की, त्याचं आधीच लग्न झालं आहे. मात्र, मुलीच्या पालकांनी ती डॉक्टर झाल्यानंतर विचार बदल्याचा आरोप नवीननं केलाय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने