पुढच्या वर्षी तिसरं महायुद्ध होऊ शकतं; बाबा वंगाने सांगितलं 2023चं भविष्य

बल्गेरियन: बल्गेरियन गूढवादी बाबा वंगाने यापूर्वी केलेल्या भविष्यवाण्या खऱ्या ठरलेल्या आहेत. त्यामुळेच या महिला बाबा वंगाच्या भविष्यवाणीकडे जगाचं लक्ष लागलेलं असतं.बाबा वंगाने २०२३ वर्षाचं भविष्य सांगितलं आहे. यामध्ये अनेक धक्कादायक दावे करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे पुढच्या वर्षी तिसरं महायुद्ध होऊ शकतं, असं बाबा वंगाने सांगितलं आहे.बाबा वंगाने १११ वर्षांपूर्वी भविष्याबाबत केलेल्या भविष्यवाण्या सिद्ध झाल्या होत्या. आता पुढच्या वर्षीसाठी बाबाने अणुहल्ल्याबाबत दावा केलाय. अणुहल्ले होऊ शकतात, त्यामुळे जगात विनाश होऊ शकतो, असं सांगितलंय. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध पुढच्या वर्षी महायुद्धाचं रुप घेऊ शकतं, असा अंदाज जोडला जातोय.याशिवाय पृथ्वी आपल्या कक्षा बदलू शकते, त्याचे गंभीर परिणाम दिसून येतील. जैविक हत्यारांच्या माध्यमातून हल्ले होऊ शकतात असंही सांगण्यात आलेलं आहे.मीडियामधील काही बातम्यांनुसार, बाबा वंगानं असंही भाकीत करुन ठेवलंय की, आता बाळाच्या जन्मापूर्वीच त्याचे पालक प्रयोगशाळेत बाळाच्या त्वचेचा रंग आणि इतर शारीरिक वैशिष्ट्ये ठरवू शकतील. जर ही भविष्यवाणी खरी ठरली तर मानवाकडून बाळंतपणाची पारंपारिक पद्धत पूर्णपणे संपुष्टात येऊ शकते.

बाबा वंगा कोण आहे?

वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा अर्थात बाबा वंगा ही एक अंध बल्गेरियन गूढ उपचार करणारी महिला होती. सन १९९६ मध्ये तिचं निधन झालं. अंध असलेल्या या ज्योतिषी महिलेनं स्वतःच्या मृत्यूची देखील भविष्यवाणी केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने