‘मेरा दिल ये पुकारे आजा’ फेम पाकिस्तानी तरुणीला विकायचाय तिचा हिरवा ड्रेस; किंमत आहे तब्बल….

मुंबई: मेरा दिल ये पुकारे आजा’ या गाण्यावर डान्स करत आपल्या व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या एका व्हिडीओमुळे पाकिस्तानी मुलगी आयशा रातोरात इंटरनेटवर व्हायरल झाली. या आयशाला आता तिच्या व्हायरल हिरव्या कुर्तीचा लिलाव करायचा आहे. तिने या ड्रेसची किंमत ३ लाख रुपये ठेवली आहे. जर तुम्हाला तिचा हा ड्रेस हवा असेल तर तुम्हाला ३ लाख रुपये खर्च करावे लागतील.पीपल मॅगझिन पाकिस्तानने दिलेल्या वृत्तानुसार, आयशाने हा ड्रेस तिच्या मैत्रिणीच्या लग्नात परिधान केला होता आणि लता मंगेशकर यांच्या ‘मेरा दिल ये पुकारे’ या गाण्यावर डान्स केला होता. तिचा डान्स व्हिडीओ एका रात्रीत सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तिने डान्स केलेलं हे गाणं १९५४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नागिन’ चित्रपटातील आहे. ते वैजयंतीमाला आणि प्रदीप कुमार यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं.या व्हिडीओमध्ये आयशाच्या डान्स स्टाइलने आणि तिच्या साधेपणाने लोकांची मनं जिंकली. तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तिचे फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात वाढले. आयशा ही पाकिस्तानमधील प्रसिद्ध टिकटॉकर आहे, तिचे टिकटॉक व्हिडीओज व्हायरल होत असतात.

एका न्यूज पोर्टलशी बोलताना आयशाला जेव्हा व्हायरल होत असलेल्या व्हिडीओबद्दल विचारण्यात आले तेव्हा आयशाने सांगितले की, तिच्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नात तिने हा डान्स केला होता. ती म्हणाली, “मला दुसर्‍या गाण्यावर डान्स करायचा होता, पण माझ्या मैत्रिणीने मला या गाण्यावर परफॉर्म करण्यास सांगितले. माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न होतं, त्यामुळे तिच्या आवडत्या गाण्यावर डान्स केला. माझ्याबरोबर तिथे डान्स करायला दुसरं कोणीच नव्हतं, त्यामुळे मी एकटीच डान्स करू लागले”, असं तिने सांगितलं.दरम्यान, तिचा हा व्हिडीओ जगभरात सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि आता तर ती या व्हिडीओतील ड्रेसचा लिलाव करतीये. हा ड्रेस तिला ३ लाख रुपयांमध्ये विकायचा आहे. त्यामुळे तिच्या फॅन्सपैकी कोण हा ड्रेस खरेदी करतं, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने