जामीन मंजूर होऊनही देशमुखांचा कारागृहात मुक्काम वाढला!

मुंबई :अनिल देशमुख यांच्या जामीनावरील स्थगीती हायकोर्टाने वाढवली आहे. सीबीआयची विनंती हायकोर्टाने मान्य केली आहे. जामीन मंजूर होऊनही देशमुखांचा कारागृहातील मुक्काम वाढणार आहे.अनिल देशमुख यांच्या जामिनावर दिलेली स्थगिती कायम ठेवावी य़ासाठी सीबीआयने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची १२ डिसेंबर रोजी जामिनावर सुटका केली.सीबीआयची मागणी हायकोर्टाने मान्य करत जामीनाला दिलेली स्थगिती २७ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत विनंती केली होती की, न्यायालय हे नाताळच्या सुट्टीनिमीत्त जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बंद आहे. त्यामुळे देशमुखांच्या जामीनाला दिलेल्या आवाहनावर सुनावणी होऊ शकत नाही, यामुळे स्थगिती वाढवून द्यावी अशी मागणी केली होती.सध्या सुरु असलेल्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरात सुरू आहे. या अधिवेशनात अनिल देशमुख यांनी आसन व्यवस्थेत देखील स्थान देण्यात आले होते. मात्र आता अनिल देशमुख अधिवेशनाला हजर राहू शकणार नाहीत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने