सुनावणीच्या आदल्याच दिवशी आरोपी आफताबने जामीन अर्ज मागे घेतला

दिल्ली : दिल्लीतल्या श्रद्धा वालकर हत्याकांडातला मुख्य आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी केलेला अर्ज आता मागे घेतला आहे.श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामधला मुख्य आरोपी आफताब अमीन पुनावाला सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने काही दिवसांपूर्वी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र सुनावणीच्या आदल्याच दिवशी त्याने आपला जामीन अर्ज मागे घेतला आहे.आफताब आणि त्याची कोठडीत असतानाची वागणूक चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या अर्जावर सुनावणी घेण्यात आली. मात्र आपण जामिनाविषयीची माहिती घेतो आणि मग अर्जावर विचार करतो, असं आफताबने सांगितलं आणि त्यानंतर न्यायालयाने सुनावणीसाठी २३ डिसेंबर ही तारीख दिली होती. मात्र त्या आधीच आफताबने आपला अर्ज मागे घेतला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने