विमानात विंडो सीट साठी क्रांती रेडकरनं घातली हुज्जत! चाहते म्हणाले...

मुंबई: क्रांती रेडकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळते. ती अनेकदा आपले व्हिडीओज,रील पोस्ट करत चाहत्यांचे लक्ष वेधून धेत असते. क्रांतीचे अनेक व्हिडीओ सामाजिक भान जपणारे असतात ज्याची चर्चा रंगते तर कधी काही मिश्किल विनोद करणारे असतात ज्यानं नेटकऱ्यांचे मनोरंजन होताना दिसते.आता क्रांतीनं एक नवा फोटो पोस्ट केला आहे ज्यात तिच्या चेहऱ्यावर कुणाशी तरी भांडतानाचे हावभाव दिसत आहेत आणि ती एका विमानात आहे हे देखील स्पष्ट होत आहे. सुरुवातीला फोटो पाहून तरी पटकन भास होतोय की विमानात दुसऱ्या पॅसेंजरसोबत कदाचित क्रांती हुज्जत घालतेय कुठल्याशा गोष्टीवरनं. आता विमानात बरेचदा सीटवरनंच वाद रंगतात त्यामुळे क्रांतीचे देखील असेच काहीसे झाले असेल असा अंदाज आपण पटकन लावू. पण चला जाणून घेऊया या फोटोमागचं सत्य नेमकं काय आहे?तर हा फोटो क्रांतीनं जो पोस्ट केलाय, तो आहे 'रेन्बो' या तिच्या आगामी मराठी सिनेमातला. विमानातला एक सीन शूट होतोय. आणि अर्थात क्रांती 'कॅप्टन ऑफ द शीप' असल्यानं दिग्दर्शकाच्या भूमिकेत शिरलेली दिसतेय. तिच्या चेहऱ्यावर भडकलेले भाव दिसतायत. आता खरी गम्मत पुढेच आहे.

क्रांतीनं सिनेमाच्या सेटवरचा हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,''माझ्या डीओपी वर मी रागावलेली नाही..तेव्हा मला या फोटोसाठी कॅप्शन सुचवा...'', मग काय क्रांतीनं असं म्हटल्यावर चाहत्यांना मोकळं मैदानच मिळालं...असे एक एक भन्नाट कॅप्शन चाहत्यांनी क्रांतीच्या फोटोला सुचवलेयत त्यानं हसून पुरती वाट लागेल. त्यातली लक्षवेधी एक कमेंट म्हणजे, 'विंडो सीटसाठी क्रांती भांडतेयस का...', किंवा दुसरी तर एक भन्नाटच आहे ज्यात एकानं लिहिलंय,'तुला सांगितलेलं बाहेर बस,आता सारखा टॉयलेटला जातोयस तर मला उठावं लागतंय...'क्रांती रेडकर दिग्दर्शित करत असलेल्या 'रेन्बो' सिनेमात सोनाली कुलकर्णी, उर्मिला कोठारे,ऋषी सक्सेना महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सध्या या सिनेमाचं शूटिंग युद्धपातळीवर सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने