अंगावर पीठ ओतलं, ढकलून दिलं अन्…; राखी सावंतचा ‘बिग बॉस’च्या घरात धिंगाणा, “अत्यंत बेकार बाई आहेस” म्हणत अपूर्वा भडकली

मुंबई: बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझनमध्ये राखी सावंतने एन्ट्री केली. अगदी तिथपासूनच तिने घरात वाद घालायला सुरुवात केली. घरातील काही सदस्यांबरोबर राखीने पंगा घेतला. पण आता तिथे सगळीच हद्द पार केली आहे. ‘बिग बॉस’ शाळेच्या टास्कनंतर राखीने अमृता देशमुख व अपूर्वा नेमळेकरवर राग काढला. तिच्याशी वाद करण्यास सुरुवात केली. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखीला अपूर्वा बोलते “तू अत्यंत बेकार बाई आहेस.” यावर राखी म्हणते, “तू बेकार बाई आहेस.” यावर राखी अमृता देशमुखला विचारते, “तू मला नापास का केलं?”राखी व अमृतामध्ये याबाबत वाद रंगतो. अमृता म्हणते, “तू सतावत होतीस म्हणून मी तुला नापास केलं.” राखीला तिचा राग अनावर होतो. ही माझी स्टाइल आहे म्हणत राखी तिच्या अंगावर किचनमधील संपूर्ण पीठ ओतते. घरातील इतर सदस्य राखी व अमृता मधील भांडणं सोडवण्यास जातात.अमृता धोंगडे राखी अमृता देशमुखच्या अंगावर धावत जात असताना तिला थांबवायला जाते. राखी अमृता धोंगडेला जोरात ढकलते. हा व्हिडीओ पाहून राखीला चांगलाच धडा शिकवा असं प्रेक्षक म्हणत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने