Jio चा धमाका! २०२३ रुपयांचा Happy New Year प्लॅन लाँच; पाहा बेनिफिट्स

मुंबई: देशातील प्रमुख टेलिकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio कडे एकापेक्षा एक शानदार प्लॅन्स उपलब्ध आहेत. कंपनी ग्राहकांसाठी सातत्याने नवनवीन प्लॅन्स लाँच करत असते. आता Reliance Jio नवीन वर्षाच्या निमित्ताने Happy New Year 2023 Offer ची घोषणा केली आहे. यासोबतच, २,९९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनला अपडेट केले आहे. या प्लॅन्समध्ये मिळणाऱ्या फायद्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.Reliance Jio चा २०२३ रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओने नवीन वर्षाच्या निमित्ताने २०२३ रुपयांचा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनची वैधता २५२ दिवस म्हणजेच ९ महिने आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज २.५ जीबी डेटा याप्रमाणे एकूण ६३० जीबी डेटाचा फायदा मिळतो. हा डेटा समाप्त झाल्यानंतर तुम्ही ६४ केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता.तसेच, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची देखील सुविधा दिली जाते. म्हणजे तुम्हाला अनलिमिटेड एसटीडी आणि रोमिंग कॉलिंगचा फायदा मिळेल.

Reliance Jio २०२३ रुपयांच्या प्लॅनमध्ये इतरही फायदे देत आहे. या रिचार्जवर कंपनी २३ दिवसांची अतिरिक्त वैधता देते. तुम्हाला ७५ जीबी अतिरिक्त डेटाचा फायदा मिळेल. तसेच, नवीन रिचार्जवर दररोज १०० एसएमएस देखील दिले जातात. जिओच्या या रिचार्जवर तुम्हाला जिओ सिनेमा, जिओ क्लाउड आणि जिओ सिक्योरिटी सारख्या अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने