गोकुळ शिरगाव MIDC मध्ये केमिकल कंपनीला भीषण आग; संपूर्ण कंपनी आगीच्या भक्षस्थानी

कोल्हापुर:  कोल्हापुरात गोकुळ शिरगाव एमआयडीसीत  एका केमिकल कंपनीला भीषण आग  लागलीये. या आगीमुळं एकच खळबळ उडाली. आग इतकी भीषण आहे की, संपूर्ण कंपनीला या आगीनं गिळंकृत केल्याचं दृश्य आहे.कोल्हापूर शहराला लागून असलेल्या गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील सेराफ्लेक्स युनिटमध्ये भीषण आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी तीनच्या सुमारास कंपनीमध्ये आग लागली आहे. या आगीचे धुराचे लोट राष्ट्रीय महामार्गावरून दिसत आहेत. यावरून आगीची भीषणता लक्षात येते.आज दुपारी चारच्या सुमारास ही आग कंपनीला लागली. ही आग कशामुळं लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून सगळीकडं मोठे धुराचे लोट दिसत आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली माहिती समोर आलेली नाही.प्राथमिक माहितीनुसार, कर्मचारी पहिल्यांदाच बाहेर पडल्याचं समजतं. मात्र, याबाबत अजून कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. जीवितहानी टाळण्यासाठी ॲम्बुलन्स आग लागलेल्या परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत. गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्या आहेत. केमिकल कंपनीत आग लागल्यानं इतर कंपन्यांकडं आग पसरू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. ही आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

पेट्रोलियम कंपनीमुळं धोका : आग लागलेल्या कंपनीचं Ceraflux India प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असं नाव आहे. दरम्यान, त्या आग लागलेल्या कंपनीच्या शेजारीच एक पेट्रोलियम कंपनी असल्यानं मोठा धोका असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोल्हापूर मनपा, विमानतळ, एमआयडीसीमधील अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.सध्या आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. पण, आग आटोक्यात येताना दिसत नाहीये. याउलट आगीचा भडका वाढताना दिसतोय, त्यामुळं आजूबाजूच्या देखील कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. एकीकडं आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असताना परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमा झालीये, त्यामुळं घटनास्थळी पोलिसांची मोठी फौज दाखल झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने