Harivansh Rai Bachchan यांच्या 'या' एका अटीमुळे अमिताभला करावं लागलं रेखाऐवजी जयाशी लग्न

मुंबई:  बिग बी अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन हे बॉलीवूडमधील एक यशस्वी कपल म्हणून ओळखले जाते पण एक वेळ अशी होती की जेव्हा चित्रपटासोबतच अमिताभ बच्चन यांची पर्सनल लाईफही चर्चेचा विषय होती.अमिताभ बच्चन यांचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले पण त्यात अभिनेत्री रेखा या अव्वल होत्या. अमिताभ आणि रेखा यांच्या प्रेमप्रकरणांने वृत्तपानाचे पान रंगवून यायची पण असं अचानक काय झालं की अमिताभ यांना रेखा सोडून जयाशी लग्न करावं लागलं. याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.अमिताभ आणि रेखाचं प्रेम प्रकरण सगळीकडे गाजले पण अमिताभ यांनी कधीच या नात्याची कबूली दिली नाही किंवा जगजाहीरपणे सांगितले नाही मात्र पत्नी जयाच्या प्रेमात आपण कसं पडलो याविषयी बिग बी स्वत: एका मुलाखतीत खुलासा केला.एका Magzine च्या कव्हर पेजवर जया बच्चन यांचा फोटो पाहून आपण जयाच्या प्रेमात पडल्याचे अमिताभ यांनी सांगितले आणि येथूनच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली.त्यावेळी जया बच्चन या बॉलीवूडच्या आघाडी अभिनेत्रींपैकी एक होत्या तर अमिताभ बच्चन यांची करीअरची सुरवात होती. पुढे त्यांचा 'जंजीर' चित्रपट बॉक्स ऑफीसवर सुपरहिट ठरला.

याच आनंदात प्रकाश मेहरांनी सर्व कलाकारांसोबत परदेशी दौऱ्यावर जायचे ठरवले होते आणि अमिताभलाही जया यांच्यासोबत जायचं होतं पण त्यांच्या वडिलांनी म्हणजेच हरिवंशराय बच्चन यांनी नकार दिला आणि जायचं असेल तर एक अट ठेवली.लग्न कर आणि नंतरच परदेशात फिरायला जा, असा आग्रह वडिलांनी धरला होता. मग काय तर अमिताभ आणि जया यांनी एका मंदिरात जाऊन लग्न केले. विशेष म्हणजे हे लग्न कुणालाही न सांगता गुपचूप करण्यात आले आणि या लग्नानंतर ते परदेशी गेले.मात्र रेखा आणि अमिताभ यांच्या चाहत्यांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने