महुआ मोईत्रा PM मोदींच्या वाटेवर; व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या, काय माहिती...

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशातील लहानांपासून ते अबालवृद्धांपर्यंत करोडो फॅन्स आहेत.सामान्यांसह देशातील अनेक नेतेदेखील मोदींना फॉलो करतात. त्यांच्या प्रत्येक कृतीची दखल घेतली जाते. अशीच एक कृती तृणमूल काँग्रेसच्या नेत्याकडून फॉलो करण्यात आली आहे. याबाबतचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रांनी बुधवारी पश्चिम बंगालच्या कृष्णनगर भागात रस्त्याच्या कडेला एका स्टॉलवर चहा बनवताचा व्हिडिओ शेअर केला आहे.मोईत्रा यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत त्याला "चाय बनाने में हाथ आजमाया... कौन जानता है कि यह मुझे कहां ले जाए" अशी कॅप्शन दिली आहे.मोईत्रा यांचा हा व्हिडिओ सध्या देशभरात चर्चेचा विषय बनला असून, अनेकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ज्यात नेटकरी म्हणतात की, देशासाठी केवळ एकच चहावाला पुरेसा असल्याचे म्हटले आहे.तर, एकाने महुआ मॅडम भारताच्या दुसऱ्या महिला पीएम बननण्याच्या मार्गावर असल्याचे मत व्यक्त केले आहे.मोईत्रा यांच्या या व्हिडिओनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रत्येक कृतीला किती महत्त्व आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.मात्र, मोईत्रा यांनी लिहिलेल्या कॅप्शनवरूनदेखील अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने