पाकिस्तानात मशिदीमध्ये बॉम्बस्फोट; दोघांचा मृत्यू

पाकिस्तान:पाकिस्तानात मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ३० जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्नालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पाकिस्तानातील पेशावर येथील मशिदीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. स्फोटामुळे मशिदीचा काही भाग कोसळला आहे. पेशावरमधील पोलिस लाइन्सजवळ असलेल्या मशिदीत जोहरच्या नमाजानंतर हा स्फोट झाला. स्फोट इतका जोरदार होता की मशिदीचा एक बाजू संपूर्ण कोसळली आहे.या घटनेत मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तहरीक-ए-तालिबान (टीटीपी) पाकिस्तानचा या भागात बराच प्रभाव असून यापूर्वी या संघटनेने येथे हल्ल्याची धमकीही दिली होती.या घटनेनंतरचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. यामध्ये जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने