'मी मध्यमवर्गातूनच, मला मध्यमवर्गाच्या अडचणी समजतात'

दिल्ली:  मी मध्यमवर्गातूनच आहे, त्यामुळे मला मध्यमवर्गाच्या अपेक्षा समजतात, असे सुतोवाच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. सध्या त्याचे हे वाक्य चांगलेच चर्चेत आले आहे. आरएसएसच्या साप्ताहिक पांजजन्स मासिकाच्या अनावरणाप्रसंगी सीतारामन बोलत होत्या.१ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर सीतारामण यांनी सुतोवाच केला आहे. मला मध्यमवर्गाच्या अडचणी समजतात, मी स्वत: सुद्धा मध्यमवर्गातून पुढे आले आहे. त्यामुळेच आतापर्यत सर्वसामान्यांवर मोठ्या कराचा कोणताही बोझा लादण्यात आलेला नाही. अर्थसंकल्पापूर्वी सरकार आयकर सीमा वाढवेल अशी अपेक्षा आहे.
काय म्हणाल्या सीतारमण?

मी स्वत: सुद्धा मध्यमवर्गातून आले आहे. वाढत्या महगाईमुळे त्यांच्यावर वाढणाऱ्या अडचणी मला समजतात. त्यामुळे मोदी सरकारने त्यांच्यावर कोणताही भार लादलेला नाही. वार्षिक ५ लाखांपर्यंतची रक्कम करमुक्त आहे. भारतातील अर्थसंकल्प २०२३ सादर करताना जागतिक आर्थिक मंदी आणि युद्धजन्य परिस्थिती ही दोन प्रमुख आव्हाने आहेत.सरकारने ईज आॅफ लिव्हिंगला प्रोत्साहन देण्यासाठी २७ शहरांमध्ये मेट्रो रेल्वे नेटवर्क विकसित करणे आणि १०० स्मार्ट सिटीसारख्या योजनांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. वाढत्या लोकसंख्येप्रमाणे पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे प्राथमिक काम आगे. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या दृष्टीने सरकारने आतापर्यंत चांगले काम केले आहे आणि यापुढेही कायम करत राहणार असल्याचे आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने