“तुम्ही नेहमीच मला…” निमृत कौरचं वडिलांबरोबर नॅशनल टेलिव्हीजनवरच जोरदार भांडण, ढसाढसा रडली अभिनेत्री

मुंबई: ‘बिग बॉस १६’मध्ये सध्या फॅमिली वीक सुरू आहे. घरातील सदस्यांचे कुटुंबिय त्यांना भेटण्यासाठी ‘बिग बॉस’च्या घरामध्ये आले आहेत. एमसीस्टॅनची आई, शिव ठाकरेची आई, फराह खान, अर्चना गौतमचा भाऊ तसेच निमृत कौर अहलुवालियाच्या वडिलांनीही ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला आहे. निमृतच्या वडिलांनी घरामध्ये प्रवेश करताच लेकीला पाहून ते भावूक झाले. पण आता नॅशनल टेलिव्हिजनवरच निमृत व तिच्या वडिलांमध्ये भांडण झालं आहे.‘बिग बॉस १६’चा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये निमृत तिच्या वडिलांबरोबर भांडताना दिसत आहे. निमृतचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. निमृत आणि तिच्या वडिलांमध्ये साजिद खान आणि मंडलीबाबत चर्चा होताना दिसत आहे.
“साजिद खानने एमसी स्टॅनला का सांगितलं की निमृत वेळ आली की धोका देणार. मंडलीच्या बाहेरही तू बघितलं पाहिजे.” पण आपल्याच मित्र-मंडळींबाबत वडील असं बोलत आहेत हे निमृतला पटलं नाही. वडील तिच्याशी बोलत असतानाचा ती रडत उठून निघून जाते. निमृतला अश्रू अनावर होतात.निमृत रडत तिच्या वडिलांना म्हणते, “इतर आई-वडील आपल्या मुलांना शाबासकीची थाप देतात. पण तुम्ही मला नेहमीच कमी लेखता.” निमृत व तिच्या वडिलांचं भांडण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. निमृत तिची मंडली म्हणजेच शिव, साजिद, एससी स्टॅन, अब्दू रोजिकबरोबर खेळताना दिसते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने