भर कार्यक्रमात जॉननं व्यक्त केली शाहरुखवरची नाराजी, किंग खानवर प्रश्न विचारताच म्हणाला..

मुंबई:  बॉलीवूडचा सर्वात चर्चेत असलेला 'पठाण' सिनेमा २५ जानेवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शनासाठी आता सज्ज आहे. एकीकडे सिनेमाला घेऊन खूप वाद सुरु असताना दुसरीकडे सिनेमाचा ट्रेलर पाहून चाहतावर्ग खूश झाला आहे.सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शना अंतर्गत बनलेल्या या सिनेमात जॉननं महत्त्वाची भूमिका साकारली आहे. जॉन सिनेमात खलनायकाची व्यक्तिरेखा साकारत पडद्यावर शाहरुखला भिडताना दिसणार आहे. पण काही दिवसांपूर्वीच बातम्या समोर आल्या होत्या की शाहरुख आणि जॉनमध्ये काहीतरी बिनसलं आहे,याचं कारणही काहीतरी समोर आलं होतं. पण आता या सगळ्या दरम्यान जॉननं चुप्पी तोडत स्पष्टिकरण दिलं आहे. त्यानं पठाण सिनेमाविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे,जी जोरदार व्हायरल होत आहे.'पठाण'चा ट्रेलर पाहून चाहते भलतेच खूश आहेत. त्यामुळे आपल्या चाहत्यांचे आभार मानण्यासाठी जॉनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्यानं यात आपल्या सबंध करिअरमधली सगळ्यात चांगली भूमिका ऑफर केल्याबद्दल आदित्य चोप्राला देखील धन्यवाद दिले.त्यानं इन्स्टा स्टोरीत लिहिलं की,''माझ्या सिनेक्षेत्रातील इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत,हा क्षण खूप अविस्मरणीय..तसंच खूप खास राहिल. माझ्या पठाण सिनेमाला तुम्ही चाहत्यांनी खूप प्रेम दिलंत हे खूपच छान घडतंय. या सिनेमाला बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. खूप मोठा सिनेमा आहे हा''.

John Abraham पुढे म्हणाला,''आदित्य चोप्रानं मला नेहमीच खूप चांगल्या भूमिका ऑफर केल्या आहेत. आणि आता सिद्धार्थ आनंदनं सिनेमा आणि माझ्यासोबत नेमकं काय केलंय हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. चला,आपण सर्व २५ जानेवारीची वाट पाहूया. मोठ्या पडद्यावर एका जबरदस्त मनोरंजनासाठी तयार रहा. आमच्या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद देण्यासाठी धन्यवाद''.एका कार्यक्रमात जेव्हा जॉनला शाहरुख विषयी प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यानं उत्तर देण्यासाठी नकार दिला. आणि म्हटलं-'पुढचा प्रश्न विचारा'. त्याची त्यावेळची रिअॅक्शन पाहून उपस्थित सगळेच हैराण झाले. सगळ्यांच्याच मनात आता बरेच प्रश्न निर्माण होत आहेत. जॉन पठाणच्या ट्रेलरच्या फायनल कटवर खूश नव्हता असं देखील म्हटलं जात आहे. आणि यामुळेच शाहरुख-जॉनमध्ये गोष्टी ठीक नाहीत असा सूर उमटतोय.'पठाण' सिनेमात जॉननं खलनायक साकारला आहे,जो एका ग्रुपचा मुख्य असतो आणि देशात हल्ले घडवून आणण्याचा त्याचा इरादा असतो. शाहरुख खान 'पठाण' च्या भूमिकेत आहे आणि सिनेमाlत जॉन विरोधातील मिशनमध्ये दीपिका शाहरुखला म्हणजे 'पठाण'ला सहकार्य करताना दिसणार आहे. सिनेमात जबरदस्त अॅक्शन पहायला मिळणार आहे.. पण आता दीपिकाविषयी वेगळी चर्चा सुरु आहे की सिनेमात खलनायक खरी तिच आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने