व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर सेनेच्या सत्ता संघर्षावर लागणार निकाल? कोर्टाने पुढे ढकलली सुनावणी

मुंबई: सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला होणार आहे. खरी शिवसेना कोणाची? यावर गेल्या 6 महिन्यांपासून राज्यात सत्तासंघर्ष दिसून येत आहे. हा सत्तासंघर्ष निर्णयाक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात पार पडली. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु आहे.सत्तासंघर्ष प्रकरणी घटनापीठाने 8 मुद्दे निश्चित केले आहे. यातील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने, सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावे अशी मागणी मागच्या सुनावणीवेळी केली होती.कोर्टात काय झालं?

ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी 14 फेब्रुवारीला पार पडणार आहे. 14 फेब्रुवारीला सुनावणी होणार असून 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे प्रकरण वर्ग करण्याबाबत कोणता निर्णय होऊ शकलेला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने