दुबईतही गाजतोय सोनू सूद.. विमानतळावर वाचवला एकाचा जीव..

मुंबई: साऊथ फिल्म इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता सोनू सूद आज लोकांसाठी मसिहा बनला आहे. पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू कोरोना या कामात खरा हिरो म्हणून पुढे आला सोनूने प्रवासी मजुरांपासून ते कोरोनाच्या कामात अडचणीत सापडलेल्या सर्वांना ज्या प्रकारे मदत केली ते कोणीही विसरू शकत नाही. आजही त्याच्या घरासमोर लोकांची गर्दी असते आणि त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला मदत करण्याचा तो सर्वतोपरी प्रयत्न करतो. अशातच, सोनू सूदने दुबई विमानतळावर असे काही केले की तेथील कर्मचारी आणि सर्वांनीच त्याचे कौतुक केले.


झालं असं की सोनू सूद दुबई विमानतळावर इमिग्रेशन काउंटरवर थांबला असताना एक व्यक्ती बेशुद्ध पडला. त्या व्यक्तीला तशा अवस्थेत बघून तिथे उभ्या असलेल्या लोकांना अजिबात आश्चर्य वाटले नाही की कुणी मदतीला पुढे आले नाही. पण सोनूने मात्र ताबडतोब त्या माणसाचे डोके पकडले आणि त्याला आधार देत त्याला सीपीआर म्हणजे प्रथमोपचार दिले, त्यानंतर काही मिनिटांनी तो शुद्धीवर आला.या घटनेनंतर सोनू सूदचे जोरदार कौतुक होत आहे. आजवर त्याने अनेकांना आर्थिक मदत केली आहे पण आज चक्क त्याने जीव वाचवल्याने सगळेच चकित झाले आहेत. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. केवळ चाहतेच नाही तर घटनास्थळी पोहोचलेल्या वैद्यकीय पथकानेही सोनूचे कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने