अखेर राज परीक्षेत पास! राज-कावेरीचा साखरपुडा दणक्यात..

 मुंबई : गेल्या काही आठवड्यांपासून 'भाग्य दिले तू मला' या मालिकेची प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिकेचं कथानक आणि मालिकेचे कलाकार दोघांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळेच काहीच महिन्यात ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागली. त्यातही राज आणि कावेरी यांची जोडीही प्रेक्षकांची अत्यंत आवडती झाली. ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे.

राजने आपल्या प्रेमासाठी दिलेले सर्व आव्हाने पार केली आहेत. राजसमोर खूप मोठे आव्हान तात्यांनी त्याला दिले होते. तात्यांनी राजला चॅलेंज दिले होते की या गावात राहून दाखव कमवून दाखव... आणि ते राजने स्वीकारले देखील आहे.मालिकेमध्ये राज विटांच्या भट्टीवर राबताना दिसला, शेतकाम तसेच टेम्पो ड्रायव्हर चे काम करताना दिसला, इतकेच नव्हेतर तात्यांच्या टपरीवर धुणे भांडीचे काम देखील केले. अखेर राज आणि कावेरी सर्व संकटांवर मात करत अखेर एकमेकांच्या जवळ आले..आता राज आणि कावेरीचा त्यांच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. राज आणि कावेरीचा साखरपुडा होणार आहे आणि वाढणार आहे दोघांच्या नात्यांतील प्रेमाचा गोडवा. कावेरी आणि राजचा साखरपुडा सोहळ्याचे फोटो आता समोर आले आहेत. यामध्ये राज आणि कावेरी पारंपरिक अंदाजात दिसून येत आहेत.कावेरीने आपल्या साखरपुड्यासाठी सुंदर अशी काठपदराची हिरवीगार साडी नेसली आहे.तर दुसरीकडे राजनेसुद्धा खास असा कुर्ता-पायजमा परिधान केला आहे.राज आणि कावेरी या फोटोमध्ये रोमँटिक पोझ देताना दिसून येत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने