"आधी नाही का समजलं?" भडकलेल्या पवारांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं

मुंबई: पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलचं शाब्दिक युद्ध रंगल्याचे दिसत आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही हे आत्ता फिक्स झालं आहे.मात्र तरी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही निवडणूक बिनविरेध व्हावी असे आवाहन केले आहे. मात्र या जागेवर मविआ उमेदवार देणार आहे. दरम्यान पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या जागासाठी भेटी गोठी घेण्याचा कार्यक्रम चालू केला आहे.


तर सांगितलं जात आहे की चंद्रकांत पाटील हे सर्व राजकीय पक्षाना पत्र लिहून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विनंती करणार आहेत. यावर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे.पवार कोल्हापूरमध्ये बोलत होते. ते म्हणाले की,"चंद्रकांत पाटील कोणाल पत्र लिहिणार आहेत, या संदर्भात मला कोणतीही माहिती नाही, कोल्हापूर, पंढरपूरला पोटनिवडणूक झाली होती त्यावेळी त्यांना सुचलं नाही का आत्ताच कसं सुचलं कळत नाही." असा सवालच देखील त्यांनी केला.अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.एकंदरीत पाहता कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा बिनविरोध होण्याची चिन्हे मावळली आहेत.

 इंडिया टुडेने सी-व्होटरच्या सहकार्याने 'मूड ऑफ द नेशन' सर्वेक्षण केले. त्या सर्व्हेवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, सी व्होटर्सचा सर्व्हे मी पाहिला. त्यात असं दिसतं, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनमत आहे.महाराष्ट्रातील आकडेवारी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे. सर्व्हे करणाऱ्या संस्थेची सत्यता याआधीही स्पष्ट झालेली आहे. पण मी त्यावर विश्वास ठेवणार नाही. मात्र या सर्व्हेने दिशा दाखवली असून ती दिशा सत्ताधाऱ्यांसाठी सोयीची नाही, असं दिसत, असल्याचंही पवार म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने