विजय आणि रश्मिका करत आहेत सिक्रेट डेटिंग? हा व्हायरल फोटो पाहून चाहत्यांना आला संशय

मुंबई: विजय देवरकोंडाची तरुणांमध्ये मोठी फॅन फॉलोइंग आहे. तो जे काही पोस्ट करतो, त्याच्यावर चाहत्यांची करडी नजर असते. असेच काहीसे रश्मिका मंदान्नाचेही आहे. आता नवीन वर्षाच्या निमित्ताने दोन्ही स्टार्सनी त्यांच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोटो पोस्ट केले आहे. आता त्यांच्या या पोस्टमुळे त्यांच्या अफेअरच्या बातम्यांना उधाण आले आहे.नवीन वर्षाच्या दिवशी, विजयने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर स्विमिंगपूलजवळ शॅम्पेनचा आनंद घेतानाचा एक फोटो शेअर केला. विजय देवरकोंडाच्या नवीन वर्षाच्या पोस्टनंतर पंधरा मिनिटांनंतर, रश्मिका मंदान्नाने 'हॅलो 2023' म्हणत सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला.दोघांच्या फोटोंचा बॅकग्राउंड सारखाच आहे, त्यामुळे पुन्हा एकदा डेटिंगच्या बातम्या येत आहेत. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी दोघेही मालदीवमध्ये गेल्याची चर्चा आहे. इन्स्टाग्रामवरील त्यांच्या लेटेस्ट पोस्टमध्ये, अभिनेत्री काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये रश्मिका खूपच सुंदर दिसत आहे.आपला फोटो शेअर करताना विजयने लिहिले की, '‘एक वर्ष जे काही क्षणांसाठी कायम खास राहिल… जेव्हा आपण मोठ्याने हसलो, शांतपणे रडलो, आपल्या स्वप्नाचा पाठलाग केला, काही गोष्टी जिंकलो, काही गोष्टी हरलो, तर काही गमावले.... आपल्याला सर्वकाही साजरे करण्याची गरज आहे कारण तेच जीवन आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा हे वर्ष तुम्हा सर्वांसाठी चांगले जावो,' असे सुंदर कॅप्शन विजयने लिहिले आहे.

आता विजयने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो नवीन वर्षाच्या निमित्ताने आकाशात फटाक्यांची आतषबाजी करताना दिसत आहे. आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, नेटिझन्स असा दावा करत आहेत की हा व्हिडिओ रश्मिकाने नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान कॅप्चर केला होता.कामाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या विजय देवरकोंडा शिव निर्वाण दिग्दर्शित 'कुशी' या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात समंथा हिरोईनची भूमिका साकारत आहे. जयराम, सचिन खेडेकर, मुरली शर्मा, वेनेला किशोर, लक्ष्मी, अली, राहुल रामकृष्ण, श्रीकांत अय्यंगार, शरण्य प्रदीप आणि रोहिणी देखील कलाकारांचा भाग आहेत. दुसरीकडे, रश्मिका मंदान्ना देखील अनेक चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. ती वारसुडू, मिशन मजनू, अ‍ॅनिमल आणि पुष्पा: द रुलमध्ये दिसणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने