चहावाल्याच्या मुलीची उंच भरारी; फ्लाइंग ऑफिसर होऊन करतेय देशसेवा!

मुंबई: जसे प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. तसे, प्रत्येक यशस्वी मुलीच्या मागे तिच्या वडीलांच्या कष्टाचा आशिर्वाद असतो. हेच सिद्ध करणाऱ्या घटनेची प्रचिती एका तरूणीकडे पाहुन येते. या तरूणीची हवाई दलात निवड झाली असून तिने घेतलेल्या उंच भरारीला तिच्या वडीलांच्या मेहनतीचे पंख लागले आहेत. आज या तरूणीच्या जिद्दीची कहाणी पाहुयात.मध्य प्रदेशात एक चहाची टपरी चालवणाऱ्या सुरेश गंगवाल यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. केवळ चहा विकून आपल्या 3 मुलांना शिकवले आहे. सुरेश यांचा मोठा मुलगा इंजिनिअर आहे. तर धाकटी मुलगी बी.कॉमचे शिक्षण घेत आहे. सुरेश यांची मुलगी आंचल हिची जुलै २०२२ मध्ये भारतीय हवाई दलात निवड झाली आहे. आयएएफ प्रमुख बीकेएस भदौरिया यांच्या उपस्थितीत आंचलला अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आंचलने इथपर्यंतचा प्रवास केला आहे. आंचलच्या वडीलांची मध्य प्रदेशमधील नीमच जिल्ह्यात चहाची टपरी आहे. अशा परिस्थितीतही आंचलने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर केवळ २४ व्या वर्षी हे यश मिळवले.आंचल सुरूवातीपासूनच अभ्यासू असून ती २०१७ पासून स्पर्धा परिक्षा देत आहे. त्यातूनच तिची मध्य प्रदेश पोलिसात उपनिरीक्षक म्हणून निवड झाली होती. काही काळ तिने हे कामही केले. पण, तेवढ्यावरच समाधान न मानता आंचल भारतीय सैन्यात जाण्यासाठी स्वत:ला तयार करत राहिली.

‘जेव्हा मी माझ्या पालकांना सांगितले की मला भारतीय लष्करात जायचे आहे.त्यावेळी ते माझ्यावर नाराज झाले.कारण, त्यांना माझी काळजी वाटत होती. पण, यामूळे त्यांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट आईवडीलांनी मला प्रोत्साहनच दिले. खरे तर ते दोघेही माझ्यासाठी आधारस्तंभ आहेत.२०१३ मध्ये घडलेल्या एका घटनेने आंचलला हवाई दलात भरती होण्याची प्रेरणा मिळाली. आंचलने सांगितले की २०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये विनाशकारी पूर आला होता. यादरम्यान भारतीय वायुसेनेने बचावकार्य अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडले. टीव्हीवर हे काम पाहून मला हवाई दलात भरती होण्याची प्रेरणा मिळाली. त्यावेळी मी बारावीत होते. पण, तेच ध्येय समोर ठेऊन  मी वाटचाल केली, असेही आंचलने म्हटले होते.आंचल सांगते की, मातृभूमीची सेवा करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. आणि या नोकरीकडे मी एक संधी म्हणून पाहते. देशसेवा करण्याची हि एक चांगली संधी मला मिळाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने