अरे हे चाललयं तरी काय? अब्दु रोजिक तिसऱ्यांदा घेणार बिग बॉस 16 मध्ये एंट्री!

मुंबई: टीव्हीवरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16'मध्ये सध्या खूप गोंधळ सुरू आहे. सलमान ने शोमध्ये गेल्या आठवड्यात एक मोठा ट्विस्ट आणला. अब्दू रोजिक, श्रीजिता डे तसेच साजिद खान यांना वीकेंड का वारमध्ये घरातून बाहेर काढण्यात आले. अशा परिस्थितीत आता बिग बॉस 16 च्या ट्रॉफीसाठी 9 स्पर्धकांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे. पण याचदरम्यान बिग बॉसमध्ये एक नवा ट्विस्ट येणार आहे.खरं तर, रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की अब्दू रोजिक पुन्हा एकदा शोमध्ये ग्रँड एन्ट्री करणार आहे. अशा परिस्थितीत आता अब्दु रोजिक तिसऱ्यांदा शोमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे अब्दूचे चाहते चांगलेच खूश आहेत.'द खबरी'च्या ट्विटर हँडलवरून अशी माहिती देण्यात आली आहे की, अब्दू रोजिक पुन्हा एकदा सलमान खानच्या शोमध्ये स्पर्धकांना क्लासेस देताना दिसणार आहे. 'वीकेंड का वार'मध्ये अब्दू रोजिक पाहुणा म्हणून दिसणार असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. ट्विटवर लोक भरपूर कमेंट करत आहेत आणि आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत.एका यूजरने लिहिले की, "मला वाटते की अब्दू त्याच्या गाण्याच्या प्रमोशनसाठी आला असावा. तर दुसर्‍या युजरने लिहिले की, " बिग बॉसमध्ये असे पहिल्यांदाच घडणार आहे की घरातून बाहेर काढल्यानंतर तो पुढच्या आठवड्यात पाहुणा म्हणून येणार आहे." तर एकानं लिहिलयं, "बिग बॉसलाही माहित आहे की टीआरपी कुठं आहे. बिग बॉस चालाक है ब्रो"

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने