शाहरुख खानला भेटायला अब्दू रोझिक मन्नत जवळ गेला आणि...

मुंबई: सध्या भारतभर पठाण ची जोरदार चर्चा आहे. ४ वर्षांनी शाहरुखने पठाण निमित्ताने मोठा पडदा व्यापून टाकलाय. सर्व प्रेक्षकांना आणि विशेषतः शाहरुखच्या फॅन्सना पठाण ने भुरळ घेतली आहे. याच पठाण ची क्रेझ अब्दूच्या मनात सुद्धा आहे. त्यामुळे अब्दू शाहरुखला भेटायला थेट त्याच्या घरापाशी म्हणजेच मन्नत जवळ गेला. मन्नत जवळ गेल्यावर अब्दूची हवा दिसून आली.शाहरुखचा पठाण रिलीज झाल्यानंतर काल २६ जानेवारीला बिग बॉस 16 चा स्पर्धक अब्दू शाहरुखला भेटण्याची संधी मिळण्याच्या आशेने कारच्या सनरूफमधून उभा राहिला. त्याने गळ्यात एक बोर्ड घातला होता ज्यावर लिहिले होते, “मी तुला भेटण्याशिवाय माझी इच्छा पूर्ण होणार नाही. माझे तुझ्यावर प्रेम आहे शाहरुख खान. तुझ्या सर्व चाहत्यांसोबत इथे बसून मी तुला कधी भेटणार याची वाट पाहण्यात खूप आनंद होत आहे. आता हीच इच्छा बाकी आहे. पठाण.” असं म्हणत अब्दूने शाहरुख साठी स्वतःच प्रेम दर्शवलं.शाहरुखच्या घराजवळ पोहोचताच मन्नत बाहेर उभ्या असलेल्या शाहरुखच्या फॅन्सनी अब्दूला खूप प्रेम दिले. अब्दूने सुद्धा सर्व फॅन्सच्या प्रेमाचा स्वीकार केला. अब्दू सोबत फोटो काढण्यासाठी चाहते एकच गर्दी होते. ऑनलाइन शेअर केलेल्या पापाराझी व्हिडिओमध्ये, "मला शाहरुख खान खुप आवडतो" असं अब्दू म्हणत राहतो. अब्दूने काळ्या रंगाचे जाकीट, टी-शर्ट, पॅन्ट परिधान केले होते. अब्दूची वेशभूषा सुद्धा विशेष लक्ष वेधून घेत होती.पठाण निमित्ताने शाहरुख खानने 4 वर्षांनंतर हिंदी इंडस्ट्रीत कमबॅक केलं. अलीकडे शाहरुख लाल सिंग चड्ढा , रॉकेटरी, ब्रम्हास्त्र अशा सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला.पण प्रमुख भूमिका म्हणून ४ वर्षांनी शाहरुखने पठाण च्या माध्यमातून दमदार कमबॅक केलंय. ऍक्शन-थ्रिलर 'पठाण' २५ जानेवारीला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने