भ्रष्टाचारविरोधात मुंबई पालिका अ‍ॅक्शनमोडमध्ये; 108 कर्मचाऱ्यांवर कारवाई

मुंबई: भ्रष्टाचारविरोधात मुंबई पालिकेची मोठी कारवाई केली आहे.भ्रष्टाचार प्रकरणात मुंबई पालिकेने ५५ कर्मचारी बडतर्फ, तर ५३ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.गेल्या काही दिवसात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यामध्ये विविध तक्रारी दाखल झाल्या होत्या. तसेच गुन्हेदेखील दाखल झाले होते.मात्र, याच्या चौकशीसाठी मुंबई पालिकेच्या आयुक्तांची मंजुरी लागते. परंतु, आता याची सर्व माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.ज्यामध्ये महापालिकेचे ५५ कर्मचारऱ्यांना बडतर्फ तर, ५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.कारवाई करण्यात आलेले हे कर्मचारी विविध विभागातील असून, एकूण १४२ प्रकरणे आहेत. ज्यामध्ये २०० कर्मचारी समाविष्ट होते. यामध्ये एकूण विविध १०५ खटले होते.या खटल्यांमध्ये वरील कर्मचारी होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर आता वरील कर्मचाऱ्यांना निलंबित आणि बडतर्फ करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने