भाजप आमदारांचं अनोखं आंदोलन; ऑक्सिजन सिलेंडर घेऊन पोहोचले थेट विधानसभेत!

नवी दिल्ली : प्रशासनाच्या मुद्द्यावर नायब राज्यपाल व्हीके सक्सेना  यांच्याशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, आप सरकारनं आजपासून दिल्ली विधानसभेचं तीन दिवसीय अधिवेशन बोलावलंय.या हिवाळी अधिवेशनाला वादळी सुरुवात झालीये. दिल्लीतील वायू प्रदूषणावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केलीये. मात्र, विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी यासाठी परवानगी दिलेली नाहीये.राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या गंभीर स्थितीबाबत भाजप आमदारांनी अनोखं आंदोलन केलंय. भाजपचे अनेक आमदार ऑक्सिजन सिलेंडर  घेऊन आणि ऑक्सिजन मास्क घालून दिल्ली विधानसभेत पोहोचले आहेत.या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास होणार नाही, त्यावरून विरोधकांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केलीये. दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामवीर सिंह बिधुरी म्हणतात, हे जाणूनबुजून केलं जात आहे. याबाबत विधानसभेत निषेधही नोंदवणार आहोत. दुसरीकडं, विधानसभेचे अध्यक्ष गोयल यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला प्रश्न विचारण्यासाठी एक वेळ निश्चित केलीये. भाजप प्रत्येक बाबतीत राजकारण करतं जे योग्य नाही. 16, 17 आणि 18 जानेवारीला विधानसभेच्या बैठका होणार आहेत. कामाची अत्यावश्यकता लक्षात घेऊन सभागृहाची बैठकही वाढवता येईल, असं अध्यक्षांनी सांगितलंय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने